पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

भारताने 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य निर्धारित वेळेच्या 5 महिने आधीच पूर्ण केले

Posted On: 05 JUN 2022 4:13PM by PIB Mumbai

 

देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवण्यासाठी, इंधनाच्या आयतीवरचे अवलंबित्त्व कमी करण्यासाठी, परदेशी चलन वाचवण्यासाठी, पर्यावरणाबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि देशाच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी भारत सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमाचा प्रचार करत आहे. सरकारने 2018 मध्ये अधिसूचित केलेल्या जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरणामध्ये 2030 सालापर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे सूचक लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तरीही, 2014 पासून सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे झालेली उत्साहवर्धक कामगिरी लक्षात घेता 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य वर्ष 2030 ऐवजी 2025-26 मधेच पूर्ण होणार आहे. 

माननीय पंतप्रधानांनी जून 2021  मध्ये प्रकाशित केलेल्या भारतामधील इथेनॉल मिश्रणाचा मार्ग 2020-25 मध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे ध्येय गाठ्ण्यासाठीचा मार्ग तपशीलवार मांडण्यात आला होता. 

मात्र, सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) केलेल्या समन्वयीत प्रयत्नांमुळे 10% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट नोव्हेंबर, 2022 या नियोजित वेळेच्या खूप आधी पूर्ण झाले आहे, यानुसार सार्वजनिक क्षेत्रातल्या ओएमसी नी देशभर पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

गेल्या 8 महिन्यांमधील या उद्दिष्ट पूर्तीने केवळ भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवली नाही, तर 41,500  कोटी पेक्षा जास्त परदेशी चलनाच्या स्वरुपात त्याचा लाभ झालाहरित वायु उत्सार्जानामध्ये (GHG) 27 मेट्रिक टन घट झाली तर शेतकर्‍यांना 40,600 कोटी रुपये खर्चाची रक्कम प्रदान करण्यात आली. 

सरकारने केलेल्या या सर्व उपाययोजनांमुळे ईबीपी कार्यक्रम 2025-26 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहे.

***

S.Thakur/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1831315) Visitor Counter : 319