सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अनुसूचित जाती समुदायातील उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षण योजनेचा (श्रेष्ठ) केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार उद्या करणार प्रारंभ
Posted On:
02 JUN 2022 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2022
घटनात्मक अधिकारानुसार अत्यंत गरीब अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण आणि संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, लक्ष्यित क्षेत्रांतील विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षणाची योजना (श्रेष्ठ) तयार करण्यात आली आहे.अनुसूचित जाती समुदायातील विद्यार्थ्यांना बऱ्याच काळापासून असमानतेचा सामना करावा लागत होता . त्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते आणि पुरेशा शिक्षणाअभावी पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या गैरसोयींना कायम ठेवणारी परिस्थिती निर्माण झाली होती. जवळपास सार्वत्रिक पोहोच साध्य करण्यासाठी भेदभावाशिवाय शैक्षणिक सुविधांचा प्रसार करण्याचे सुरु असलेले सरकारी प्रयत्न चांगले काम करत आहेत. मात्र, समान संधी प्रदान करणारे दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट अद्यापही वास्तवापासून दूर आहे.अनुसूचित जाती समुदायातील गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे निवासी शिक्षण मिळावे यासाठी लक्ष्यित क्षेत्रांतील उच्च माध्यमिक शाळांमधील ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न वार्षिक 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत विनामूल्य शिक्षण देणाऱ्या निवासी शिक्षण योजना ( श्रेष्ठ ) ची संकल्पना मांडण्यात आली आहे.
या अंतर्गत, राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए ) द्वारे आयोजित केलेल्या श्रेष्ठ (एसएचआरईएसएचटी) (एनईटीएस ) साठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षेच्या पारदर्शक यंत्रणेद्वारे दरवर्षी राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील अनुसूचित जातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांची (अंदाजे 3000) निवड केली जाते.निवडलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सीबीएसई द्वारे संलग्न असलेल्या सर्वोत्कृष्ट खाजगी निवासी शाळांमध्ये इयत्ता 9वी आणि 11वी मध्ये प्रवेश दिला जातो.
इयत्ता 9 वी आणि 11 वी मध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त प्रवेश देण्याच्या अनुषंगाने शाळांच्या निवडीसाठी मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसई आणि विभागाच्या वित्त विभागाच्या प्रतिनिधींसह एका समितीद्वारे, सीबीएसईशी संलग्न असलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खाजगी निवासी शाळांची निवड काही मापदंडांच्या आधारे केली आहे.जसे की (i) शाळा किमान गेल्या 5 वर्षांपासून अस्तित्वात आहेत , (ii) 10वी आणि 12वीचे शाळांचे बोर्डाचे निकाल गेल्या 3 वर्षांपासून 75% पेक्षा जास्त होते आणि (iii) शाळांमध्ये पुरेशा पायाभूत सुविधा आहेत.
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती शाळा शुल्क (शिक्षण शुल्कासह) आणि वसतिगृह शुल्क (भोजनगृह शुल्कासह) खाली दिलेल्या कमाल मर्यादेच्या अधीन असेल:
इयत्ता
|
प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष शिष्यवृत्ती (रु.)
|
9वी
|
1,00,000
|
10वी
|
1,10,000
|
11वी
|
1,25,000
|
12वी
|
1,35,000
|
शिष्यवृत्ती प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत थेट शाळांना एका हप्त्या मध्ये दिली जाईल.मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर वेळोवेळी लक्ष ठेवले जाईल. ही योजना थेट लाभ हस्तांतरण स्वरूपात मानली जाईल.
G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830602)
Visitor Counter : 502