कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळशाच्या आयातीत 2019-20 मधील 248 दशलक्ष टनांवरून 2021-22 मध्ये 209 दशलक्ष टन इतकी घट


ऊर्जा क्षेत्रातील कोळशाची आयात 40 टक्क्यांनी घटली

2021-22 मध्ये कोळशाच्या एकूण उत्पादनात 61 दशलक्ष टनांची वृध्दी झाली

Posted On: 02 JUN 2022 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2022

 

कोळशाची आयात,जी 2019-20 मध्ये 248 दशलक्ष टन (दशलक्ष टन) इतक्या उच्च स्तरावर पोहोचली होती, त्यामध्ये पुढील दोन वर्षात सातत्याने घट झाली आहे. 2020-21 मध्ये 215 दशलक्ष टन आणि पुढे 2021-22 मध्ये 209 दशलक्ष टनांपर्यंत खाली आली आहे.

वास्तविक कोळशाच्या मागणीत 2019-20 मध्ये 956 दशलक्ष टनांवरून 2021-22 मध्ये 1027 दशलक्ष टनांपर्यंत सतत वाढ होऊनही, कोळशाची आयात वाढलेली नाही. 2009-10 ते 2013-14 या कालावधीत कोळशाची आयात 22.86% अशा वार्षिक चक्रवाढीच्या गतीने  (CAGR) वाढली.या वार्षिक चक्रवाढीच्या गतीने (CAGR ), कोळशाची आयात 2020-21 मध्ये 705 दशलक्ष टन आणि पुढे 2021-22 मध्ये 866 दशलक्ष टन वर पोहोचली असती.देशांतर्गत पुरवठा कायम ठेवूनच कोळशाची ही आयातीतली वाढ नियंत्रणात ठेवली जाऊ शकते.

अखिल भारतीय कोळसा उत्पादन 2020-21 मध्ये 716 दशलक्ष टन वरून 2021-22 मध्ये 777 दशलक्ष टन पर्यंत वाढले आहे परिणामी 61 दशलक्ष टन  इतकी वाढ झाली आहे.  त्यामुळे, 2020-21 मधील मागणीत 906 दशलक्ष टन वरून 2021-22 मध्ये 1027 दशलक्ष टन पर्यंत सतत प्रचंड वाढ होऊनही, 2020-21 मधील देशांतर्गत उत्पादन 691 दशलक्ष टन आणि 2021-22 मध्ये 818 दशलक्ष टनांपर्यंत वाढल्यामुळे कोळशाची ही  आयात रोखली गेली असू शकेल. 

2020-21 मध्ये 101 दशलक्ष टन ते 2021-22 मध्ये 104 दशलक्ष टनाने देशांतर्गत संप्रेषण केवळ ऊर्जा क्षेत्रासाठीच नाही तर बिगर-उर्जा क्षेत्रात देखील वाढलेले आहे.

2021-22 मध्ये कोळशाच्या आयातीतील घट मुख्यत्वे ऊर्जा क्षेत्रातील आयात कमी झाल्यामुळे झाली आहे; जी 2020-21 मध्ये 45 दशलक्ष टनांवरून 2021-22 मध्ये 27 दशलक्ष टनांपर्यंत खाली आली, म्हणजे जवळजवळ 40% ची घसरण झाली आहे. 2021-22 मधील उर्जा क्षेत्रासाठी कोळशाच्या आयातीची तुलना 2019-20 च्या कोविडपूर्व  वर्षाशी केली तर ही घट अधिक तीव्र झालेली दिसून येते,जेव्हा ही आयात 69 दशलक्ष टन इतकी होती.देशातील एकूण औष्णिक उर्जा उत्पादन 2020-21 मध्ये 1032 BU वरून 2021-22 मध्ये 1115 BU पर्यंत वाढले आहे, त्यात 83 BU ची निव्वळ वाढ झाली आहे आणि टक्केवारीच्या दृष्टीने ती जवळजवळ 8% आहे.

स्टील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या कोकिंग कोळशाच्या आयातीत 2021-22 मध्ये 11.65% वाढ होऊन ती 57 एमटी इतकी झाली होती.तथापि, 2019-20 या वर्षी कोविडपूर्व वर्षाच्या तुलनेत, कोकिंग कोळशाच्या आयातीत झालेली वाढ सुमारे 10 टक्के आहे.

 

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1830556) Visitor Counter : 197
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil