माहिती आणि प्रसारण मंत्रालय

देश हिताच्या दृष्टीकोनातून कृती करण्याचे डायरेक्ट-टू-मोबाइल प्रसारण परिषदेत आवाहन

Posted On: 02 JUN 2022 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2022

नवी दिल्लीतील प्रसार भारतीच्या आकाशवाणी रंग भवन सभागृहात 1 जून 2022 रोजी ,दूरसंचार मानक विकास संस्था , भारत (टीएसडीएसआय ) च्या सहकार्याने आयआयटी कानपूरच्या वतीने 'डायरेक्ट टू मोबाईल आणि 5G ब्रॉडबँड - कन्व्हर्जन्स रोडमॅप' या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती

माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा, टीएसडीएसआयचे अध्यक्ष एन. जी सुब्रमण्यम, दूरसंचार विभागाचे सदस्य (तंत्रज्ञान) ए. के. तिवारी, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती, आयआयटी कानपूरचे संचालक प्रा अभय करंदीकर आणि टीएसडीएसआयच्या महासंचालक पामेला कुमार यांच्यासह भारतीय दूरसंचार प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष डॉ. पी डी वाघेला या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डायरेक्ट टू मोबाईल आणि 5जी ब्रॉडकास्ट परिषद ही प्रसारण , मोबाइल, ब्रॉडबँड, माध्यमे आणि इतर सर्व संबंधित हितसंबंधितांना एकत्र आणण्यासाठी संधी प्रदान करते, असे परिषदेत उद्घाटनपर भाषण करताना ट्रायचे अध्यक्ष डॉ. पीडी वाघेला यांनी सांगितले.

या परिषदेत आयआयटी कानपूर, टीएसडीएसआयआणि प्रसार भारती यांनी डायरेक्ट टू मोबाइल प्रश्र्नांवर संयुक्त श्वेतपत्रिका जारी करण्यासह स्मार्ट फोन आणि इतर स्मार्ट उपकरणांवर अत्याधुनिक प्रसारण तंत्रज्ञान प्रथमच या परिषदेमध्ये प्रदर्शित करण्यात आले.

ग्राहकांच्या दृष्टीकोनातून बोलताना माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले की, डायरेक्ट-टू-मोबाइल आणि 5जी ब्रॉडबँडमधील एकत्रीकरण भारतातील ब्रॉडबँडचा वापर आणि स्पेक्ट्रमचा वापर सुधारेल.आता जवळजवळ प्रत्येकजण त्यांच्या मोबाईलद्वारे चित्रफीत मजकुराचा वापर करत आहे, प्सद्वारे मोबाईलवर बातम्या पाहता येतात,आणि प्रसार भारतीचे स्वतःचे न्यूज ऑन एआयआर ॲप आहे ज्याचा ग्राहकवर्ग मोठा आहे.डायरेक्ट-टू-मोबाइल आणि 5जी ब्रॉडबँडमधील या एकत्रितपणामुळे पायाभूत सुविधांमध्ये काही बदल आणि काही नियामक बदल होतील.''

सांख्य लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग नाईक यांच्याशी थेट संवाद साधताना, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती यांनी भारतासारख्या देशासाठी धोरणात्मक आणि देश हिताच्या दृष्टीकोनातून डायरेक्ट टू मोबाइल प्रसारणाचे महत्त्व विशद केले.

या परिषदेमध्ये प्रकाशित झालेल्या श्वेतपत्रिकेत डायरेक्ट टू मोबाइल आणि 5जी ब्रॉडबँडच्या एकत्रीकरणाने भारतात डायरेक्ट टू मोबाइल ब्रॉडकास्टिंग क्षमता साकारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. आणि ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विविध भागधारकांना कृती करण्याच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=YjSiGoB8qvU

https://prasarbharati.gov.in/demo-of-direct-to-mobile-broadcasting/

 

https://www.youtube.com/watch?v=hxrs5Q2-j1w

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 (Release ID: 1830537) Visitor Counter : 166