कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोळसा मंत्रालयाने घेतले पीएम-गती शक्ती अंतर्गत तेरा रेल्वे प्रकल्प हाती


उच्च प्रभाव श्रेणी अंतर्गत चार रेल्वे प्रकल्प

कोळशाच्या जलद आणि पर्यावरणास अनुकूल वाहतुकीवर भर

प्रविष्टि तिथि: 02 JUN 2022 4:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2022

कोळसा मंत्रालयाने,स्वच्छ पर्यावरणाच्या दृष्टीने रेल्वेने कोळशाची वाहतुक करण्याच्या कार्याला गती दिली आहे आणि देशात कोळशाची  रस्त्यावरील वाहतुक  हळूहळू कमी करण्यासाठी प्रथमतः प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रीनफिल्ड कोळसा असलेल्या भागात नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन्सचे नियोजित बांधकाम, नवीन लोडिंग पॉईंट्सपर्यंत रेल्वेच्या जाळ्याचा विस्तार करणे आणि काही ठिकाणी रेल्वे मार्ग दुहेरी आणि तिहेरी करणे यामुळे रेल्वेने कोळशाची वाहतूक करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.

विविध मंत्रालयांना एकत्र आणत तसेच पायाभूत सुविधा जोडणी प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजनासाठी आणि समन्वित अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी ऑक्टोबर 2021 मध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी गती शक्ती-या योजनेचा राष्ट्रव्यापी मुख्य आराखडा तयार केला आहे.यामध्ये विविध मंत्रालये आणि राज्य सरकारांच्या पायाभूत सुविधा योजनांचा समावेश केला जाईल त्याचप्रमाणे स्थानिक नियोजन साधनांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा लाभही घेतला जाईल.

पीएम गति शक्ती या योजनेचे  उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने, कोळसा मंत्रालयाने बहुविध सुगमता विकसित करण्यासाठी 13 रेल्वे प्रकल्प हाती घेतले आहेत आणि प्रत्येक प्रकल्पासाठी अनियोजित पायाभूत सुविधांची तफावत लक्षात घेतली आहे.झारखंड आणि ओडिशा राज्यांमध्ये विकसित होणार्‍या हाय इम्पॅक्ट प्रकल्पांतर्गत एनएमपी(NMP) पोर्टलमध्ये चार रेल्वे प्रकल्पांची यशस्वीरित्या आखणी केलेली आहे आणि त्यायोगे सर्व व्यावसायिक खाण उद्योजकांसाठी जलद लॉजिस्टिक्स आणि व्यापक कनेक्टिविटीसह कोळशाची वाहतूक करणे सुलभ होईल.

 

 S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(रिलीज़ आईडी: 1830491) आगंतुक पटल : 454
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil