आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 193.70 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 3.41 कोटींपेक्षा जास्त किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,509

गेल्या 24 तासात 3,712 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.67%

Posted On: 02 JUN 2022 9:34AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 193.70 (1,93,70,51,104)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,46,20,654 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.


देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.41 (3,41,31,661) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:


 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,07,113

2nd Dose

1,00,41,351

Precaution Dose

52,54,370

FLWs

1st Dose

1,84,19,449

2nd Dose

1,75,86,304

Precaution Dose

88,03,679

Age Group 12-14 years

1st Dose

3,41,31,661

2nd Dose

1,69,03,853

Age Group 15-18 years

1st Dose

5,95,27,972

2nd Dose

4,59,17,988

Age Group 18-44 years

1st Dose

55,72,24,076

2nd Dose

49,07,06,734

Precaution Dose

9,40,618

Age Group 45-59 years

1st Dose

20,32,63,767

2nd Dose

19,10,03,648

Precaution Dose

14,46,005

Over 60 years

1st Dose

12,71,00,132

2nd Dose

11,91,39,334

Precaution Dose

1,92,33,050

Precaution Dose

3,56,77,722

Total

1,93,70,51,104

 


भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  19,509 इतका आहे,ही संख्या देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.05% इतकी आहे.



परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% आहे.गेल्या 24 तासांत 2,584 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,26,20,394 झाली आहे.



गेल्या 24 तासात 3,712 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.


गेल्या 24 तासात एकूण 4,41,989  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 85.13 (85,13,38,595)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.67% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.84% आहे.


****

Shailesh P/Sampada/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830350) Visitor Counter : 182