सांस्कृतिक मंत्रालय
ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथून हस्तगत केलेल्या 10 प्राचीन कलाकृती (शिल्पे) आज नवी दिल्लीत तामिळनाडू सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्या
"गेल्या 8 वर्षांत सरकारने 228 वारसा वस्तू परत आणल्या आहेत, स्वातंत्र्यापासून वर्ष 2013 दरम्यान केवळ 13 प्राचीन कलाकृती भारतात परत आणल्या गेल्या": जी किशन रेड्डी
Posted On:
01 JUN 2022 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2022
ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका इथून हस्तगत केलेल्या दहा प्राचीन कलाकृती (शिल्पे) आज नवी दिल्लीत तामिळनाडू सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्या. केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री (DoNER) जी किशन रेड्डी यावेळी उपस्थित होते. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स (IGNCA), येथे तामिळनाडू सरकारला 10 कलाकृती हस्तांतरित करताना सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी; सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्यासह सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, परराष्ट्र मंत्रालय आणि तामिळनाडू सरकारचे अधिकारीही उपस्थित होते.
या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “गेल्या 8 वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने आपली प्राचीन संस्कृती जतन करण्यासाठी, आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करण्यासाठी आणि जगभरात भारतीय ज्ञान प्रणालींचा आणि परंपरांचा प्रसार करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ब्रिंगिंग अवर गॉड्स होम हा असाच एक उपक्रम आहे ज्याचे मूळ आपल्या वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यात आहे.” असे ते म्हणाले. “या देशांच्या जागतिक नेत्यांशी पंतप्रधानांचे वैयक्तिक आणि प्रेमळ संबंध यामुळे संबंधित देशांना या चोरून आणलेल्या प्राचीन कलाकृती ओळखता आल्या आणि त्या परत आणेपर्यंत त्यांनी सहकार्य केले. त्यामुळे याचे सर्व श्रेय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. त्यांनी या पुरातन वास्तू परत मिळवण्यासाठी केवळ प्रयत्नच केले नाहीत तर परदेशात त्यांच्या अधिकृत दौऱ्यांदरम्यान त्या स्वतः परत आणल्या आहेत.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830268)
Visitor Counter : 145