ऊर्जा मंत्रालय
पंतप्रधान उद्या शिमला येथे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार
पंतप्रधान 21,000 कोटी रुपये किमतीच्या किसान सम्मान निधीचा 11 वा हप्ता जारी करणार
Posted On:
30 MAY 2022 7:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2022
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून उद्या ‘गरीब कल्याण संमेलन’ आयोजित केले जाणार असून हा देशाच्या सर्व जिल्ह्यांमधे पोहोचणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा राष्ट्र-स्तरीय संवाद असेल. भारत सरकारच्या 9 मंत्रालये/विभागांच्या जवळजवळ 16 योजनांच्या लाभार्थ्यांबरोबर माननीय पंतप्रधान संवाद साधतील. प्रधानमंत्री किसान सम्मान निधी, प्रधान मंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधान मंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण आणि शहरी), जल जीवन अभियान आणि अमृत, प्रधान मंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र एक शिधा पत्रक, प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत आरोग्य आणि सास्थ्य केंद्र आणि प्रधान मंत्री मुद्रा योजना या व्यापक योजना/कार्यक्रमांच्या परिणामाबद्दल माननीय पंतप्रधान लाभार्थ्यांशी संवाद साधतील. शिमला येथे उद्या आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात पंतप्रधान 21,000 कोटी पेक्षा जास्त रकमेच्या किसान सम्मान निधीचा 11 वा हप्ता जारी करतील.
केंद्रीय ऊर्जा आणि एनआरई मंत्री श्री. आर. के. सिंह या देशव्यापी कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून भोजपूर (बिहार) येथून सहभागी होतील. सकाळी 9:45 ते 10:50 या वेळात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्री. आर. के. सिंह भोजपूर येथील लाभार्थ्यांशी संवाद साधतील. यावेळी विविध योजनांवरील चित्रफिती दाखवल्या जातील. त्यानंतर श्री. सिंह दृकश्राव्य माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमात सहभागी होतील.
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829562)
Visitor Counter : 245