आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 193.28 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.37 कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 17,087

गेल्या 24 तासात 2,828 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.56%

Posted On: 29 MAY 2022 9:34AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 193.28 (1,93,28,44,077) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,44,88,568 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.


देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.37 (3,37,83,574) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10406894

2nd Dose

10039268

Precaution Dose

5205957

FLWs

1st Dose

18418946

2nd Dose

17582714

Precaution Dose

8653922

Age Group 12-14 years

1st Dose

33783574

2nd Dose

16042506

Age Group 15-18 years

1st Dose

59428860

2nd Dose

45591799

Age Group 18-44 years

1st Dose

557103906

2nd Dose

489674308

Precaution Dose

822917

Age Group 45-59 years

1st Dose

203241493

2nd Dose

190773988

Precaution Dose

1364997

Over 60 years

1st Dose

127084120

2nd Dose

118983051

Precaution Dose

18640857

Precaution Dose

3,46,88,650

Total

1,93,28,44,077


भारतातील रुग्णसंख्या सध्या 17,087 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.

 
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे.

गेल्या 24 तासात 2,035 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,26,11,370 झाली आहे.



गेल्या 24 तासात 2,828 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 


गेल्या 24 तासात एकूण 4,74,309 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.97 (84,97,99,142) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.56% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.60% आहे.

***

 

SonalTupe/Sushma Kane/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1829136) Visitor Counter : 163