आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 192.82 मात्रांचा टप्पा केला पार
12-14 वर्षे वयोगटात 3.33 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
भारतात उपचाराधीन रुणसंख्या सध्या 15,414
गेल्या 24 तासात 2,628 नव्या रुग्णांची नोंद
कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.75%
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.51%
Posted On:
26 MAY 2022 10:10AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 192.82 कोटींहून अधिक (1,92,82,03,555) मात्रांचा टप्पा पार केला. 2,43,56,591 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.
16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत 3.33 कोटींहून अधिक (3,33,02,653) किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,06,720
|
2nd Dose
|
1,00,36,970
|
Precaution Dose
|
51,64,395
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,18,613
|
2nd Dose
|
1,75,78,684
|
Precaution Dose
|
85,35,082
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
3,33,02,653
|
2nd Dose
|
1,51,26,171
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
5,93,02,696
|
2nd Dose
|
4,52,06,782
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,69,84,375
|
2nd Dose
|
48,85,12,628
|
Precaution Dose
|
6,88,611
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,32,19,615
|
2nd Dose
|
19,05,07,691
|
Precaution Dose
|
12,68,958
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,70,69,599
|
2nd Dose
|
11,88,01,774
|
Precaution Dose
|
1,80,71,538
|
Precaution Dose
|
3,37,28,584
|
Total
|
1,92,82,03,555
|
भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 15,414 इतकी आहे.हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.04% आहे.
परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.75% इतका आहे. गेल्या 24 तासांत 2,167 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,26,04,881. इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात 2,628 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 4,52,580 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.84 कोटी (84,84,11,356) चाचण्या केल्या आहेत.
देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.51%आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.58%. नोंदविण्यात आला आहे.
***
JPS/SBC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828419)
Visitor Counter : 190