राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते तिरुवनंतपुरम येथे राष्ट्रीय महिला आमदार परिषद 2022 चे उद्या उद्घाटन होणार
Posted On:
25 MAY 2022 9:52PM by PIB Mumbai
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी (25 मे 2022) केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या दौऱ्यावर रवाना होतील. 29 मे 2022 रोजी आपला नियोजित दौरा संपवून राष्ट्रपती दिल्लीला परत येतील.
26 मे या दिवशी तिरुवअनंतपुरम येथे केरळ विधान परिषदेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय महिला आमदार परिषद 2022 चे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
27 मे या दिवशी पुण्यात, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या 125 व्या वर्धापन सोहळ्यात राष्ट्रपती सहभागी होतील.
28 मे रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आरोग्य भारतीने आयोजित केलेल्या 'एक राष्ट्र- एक आरोग्य प्रणाली ही काळाची गरज' या कार्यक्रमाला संबोधित करतील. याच दिवशी होणाऱ्या दुसऱ्या कार्यक्रमात मध्य प्रदेश सरकारच्या आरोग्यविषयक विविध पायाभूत प्रकल्पांचे भूमिपूजन आणि प्रारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते होईल.
29 मे रोजी उज्जैन येथे अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या 59 व्या महाअधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.
***
S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828361)
Visitor Counter : 223