ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
गरजू आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या तसेच पतपत्रधारक देशांना गव्हाच्या निर्यातीसाठी भारत परवानगी देत राहणार : गोयल
भारत जगाचा गव्हाचा पारंपरिक पुरवठादार कधीच नव्हता : गोयल
भारताच्या निर्यात नियमनाचा जागतिक बाजारपेठांवर परिणाम होऊ नये : गोयल
Posted On:
25 MAY 2022 7:41PM by PIB Mumbai
ज्या देशांना गव्हाची अत्यंत गरज आहे, तसेच ज्यांच्याबरोबर आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि ज्यांच्याकडे पतपत्र आहे, अशा देशांसाठी भारत गव्हाच्या निर्यातीला परवानगी देत राहील, असे केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण, वाणिज्य आणि उद्योग आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले. स्वित्झर्लंडमधल्या दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वर्षी गव्हाच्या उत्पादनात 7% -8% वाढ अपेक्षित असताना, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे पिकाची लवकर काढणी करावी लागली परिणामी उत्पादनाचे नुकसान झाले, असे गोयल यांनी अधोरेखित केले. सध्याची परिस्थिती पाहता, आम्ही जे उत्पादन करीत आहोत ते देशांतर्गत असणारी गव्हाची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे, असे गोयल पुढे म्हणाले.
आंतरराष्ट्रीय गव्हाच्या बाजारपेठेत भारत कधीही पारंपरिक निर्यातदार नव्हता. देशाने गव्हाची निर्यात फक्त 2 वर्षांपूर्वीच सुरू केली आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाच्या कार्यक्रमात बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, गेल्या वर्षी 7 लाख मेट्रिक टन गहू निर्यात करण्यात आला होता.यापैकी बहुतांश गहू हा गेल्या दोन महिन्यांत निर्यात करण्यात आला आहे ज्यावेळी रशिया-युक्रेनमधील युद्ध सुरू झाले होते .
जागतिक व्यापारामध्ये भारताच्या गहू निर्यातीचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे आणि आमच्या निर्यात नियमनामुळे जागतिक बाजारपेठांवर परिणाम होऊ नये. आम्ही गरजू देश आणि शेजारी देशांना गहू निर्यात करण्यास परवानगी सुरु ठेवू” असे मंत्री म्हणाले.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828312)
Visitor Counter : 209