आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 192.67 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.31 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 14,971

गेल्या 24 तासात 2,124 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.49%

Posted On: 25 MAY 2022 10:15AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 192.67 (1,92,67,44,769) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,43,14,249 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.31 (3,31,70,120) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,06,654

2nd Dose

1,00,36,059

Precaution Dose

51,51,154

FLWs

1st Dose

1,84,18,515

2nd Dose

1,75,77,270

Precaution Dose

85,03,289

Age Group 12-14 years

1st Dose

3,31,70,120

2nd Dose

1,48,11,899

Age Group 15-18 years

1st Dose

5,92,64,516

2nd Dose

4,50,93,948

Age Group 18-44 years

1st Dose

55,69,46,139

2nd Dose

48,81,31,932

Precaution Dose

6,58,407

Age Group 45-59 years

1st Dose

20,32,12,162

2nd Dose

19,04,18,963

Precaution Dose

12,41,800

Over 60 years

1st Dose

12,70,64,300

2nd Dose

11,87,36,676

Precaution Dose

1,79,00,966

Precaution Dose

3,34,55,616

Total

1,92,67,44,769

 

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 14,971 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

 

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002CH52.jpg

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे. 

 

गेल्या 24 तासात 1,977 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,26,02,714 झाली आहे. 

 

 https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0039S2X.jpg

गेल्या 24 तासात 2,124 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.  

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004LLL7.jpg

गेल्या 24 तासात एकूण 4,58,924 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.79 (84,79,58,776) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.49% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.46% आहे.

  

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005Q7RK.jpg

****

ST/VG/CY



(Release ID: 1828151) Visitor Counter : 171