माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराजा रणजित सिंग यांच्या काळातील फ्रेंच लष्करी जनरल यांच्या सेंट ट्रोपेझ वंशजांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी हिमाचली थाल, टोपी आणि शाल दिली भेट

Posted On: 22 MAY 2022 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 मे 2022

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आपल्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान सेंट ट्रोपेझ येथे अलार्ड चौकाला भेट दिली. यावेळी त्यांनी रणजित सिंग यांच्या काळातील फ्रेंच लष्करी जनरल जीन फ्रँक्वॉ अलार्ड आणि त्यांच्या पत्नी राजकन्या बन्नू पन देई यांच्या वंशजांना हिमाचल थाल, टोपी आणि शाल भेट म्हणून दिली. राजकन्या बन्नू पन देई यांचा जन्म हिमाचल प्रदेशातील चंबा येथे झाला होता.

यावेळी मंत्रीमहोदय म्हणाले की, सेंट ट्रोपेझशी जुळलेली  भारताची नाळ चार पिढ्यांनंतरही तुटलेली नाही. राजकन्येच्या कुटुंबांला सेंट ट्रोपेझमध्ये प्रचंड आदर दिला जातो आणि त्यांनी इथेही आपली भारतीय ओळख कायम ठेवली आहेत.

फ्रान्स मध्ये नुकत्याच समाप्त झालेल्या कान चित्रपट महोत्सवात ठाकूर यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले होते.

त्या आधी, ठाकूर यांनी महाराजा रणजितसिंग, त्यांचे लष्करी जनरल आणि त्यांच्या पत्नी यांच्या सेंट ट्रोपेंझमधील अर्धपुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केले.

 

* * *

R.Aghor/U.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1827414) Visitor Counter : 218