ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
‘राइस फोर्टिफिकेशन’ अर्थात तांदळातील पोषणमूल्ये वाढवण्याच्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी अपेक्षित गुणवत्ता मानके राखण्यासाठी प्रमाणित कार्यप्रणाली (SOP) जारी केली
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत आहे
Posted On:
20 MAY 2022 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2022
कुपोषण, अशक्तपणा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दूर करण्यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग ‘राइस फोर्टिफिकेशन’ म्हणजेच तांदळातील पोषणमूल्यात वाढ करण्यासाठी अथक काम करत आहे.
विभागाचा साठवणूक आणि संशोधन विभाग, विविध सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांद्वारे तयार उत्पादनाच्या खरेदीपासून ते वितरणापर्यंत त्यांचा दर्जा तपासून पाहात आहे, तसेच एफ आर के (फोर्टिफाइड राईस कर्नल) उत्पादक/मिलर पासून स्वयं-घोषित गुणवत्ता प्रमाणपत्रावर देखरेख करत आहे. संपूर्ण कार्यक्रमाच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी/देशांतर्गत पुरवठा साखळी अंतर्गत इच्छित गुणवत्ता मानके राखण्यासाठी, एक मानक कार्यप्रणाली (एसओपी) देखील तयार केली गेली आहे आणि मार्च 2022 मध्ये अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ती जारी केली आहे.
फोर्टिफाइड राईस कर्नल आणि फोर्टिफाइड राईसचा आवश्यक असलेला दर्जा राखण्यासाठी, एसओपी महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत एफआरके उत्पादनापासून ते पात्र लाभार्थ्यांना वितरणापर्यंत विविध हितधारकांच्या स्तराप्रमाणे त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या सुनिश्चित करते. विविध हितधारकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या विभागाद्वारे परिभाषित केल्या जातात, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) देखील संपूर्ण कार्यक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
एफएसएसएआय ने फोर्टिफाइड राइस कर्नल उत्पादकांना परवाना दिला, तयार उत्पादनाच्या पॅकेजिंग आणि स्टॅन्सिलिंगसाठी विविध गुणवत्ता प्रमाणन मानके/मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली. सॅम्पलिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे, तांदळाच्या फोर्टिफिकेशनवर तांत्रिक हँडआउट इत्यादी विविध कार्यप्रणालीसाठी एफएसएसएआय नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (एनएबीएल) ही संस्था राज्यांतर्गत मान्यताप्राप्त प्रयोगशाळा देखील मॅप करत आहे जे एफ आर के /FR च्या विविध गुणवत्ता परिमाणांची चाचणी करू शकतात.
एफएसएसएआय चे अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) प्रोत्साहनकारक आणि नियमितताविषयक भूमिकाही बजावत आहेत. अधिक पोषणमूल्य असलेल्या तांदळाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी हे अधिकारी गिरणीतून आणि रास्त भाव दुकानांमधून यादृच्छिक नमुने घेत आहेत.
एफएसएसएआय हे एक संसाधन केंद्र आहे. अन्न सुरक्षा, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया, प्रिमिक्स आणि उपकरणे खरेदी आणि उत्पादन, गुणवत्ता आश्वासन आणि पोषणमूल्य जास्त असलेल्या तांदळाच्या गुणवत्तेचे नियंत्रण, मानके याविषयी माहिती आणि इतर पूरक माहिती प्रदान करते.
लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी 12 सारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये जोडण्याची प्रक्रिया म्हणजेच तांदळाचे पोषणमूल्य वाढवणे अर्थात राइस फोर्टिफिकेशन. रक्तक्षयाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी हे एक प्रभावी, प्रतिबंधात्मक आणि किफायतशीर पूरक धोरण आहे.
कुपोषणामुळे अशक्तपणाच्या गंभीर समस्येचा सामना करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रयत्नात, 2024 पर्यंत सर्व सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये तांदळाच्या पोषणमूल्यात वाढ अनिवार्य करण्याची घोषणा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट, 2021) केली होती.
* * *
S.Patil/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826958)
Visitor Counter : 230