वस्त्रोद्योग मंत्रालय
कच्च्या तागावरील दराची मर्यादा येत्या 20 मे 2022 पासून हटवण्याचा केंद्राचा निर्णय
या निर्णयाचा शेतकरी, गिरण्या आणि ताग यातील एमएसएमई क्षेत्राला होणार लाभ
दराची मर्यादा कमी केल्याच्या निर्णयाचा मूल्याच्या दृष्टीने तागाच्या निर्यातीच्या उद्योगाच्या उलाढालीलाही सुमारे 30% होणार लाभ
प्रविष्टि तिथि:
19 MAY 2022 8:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2022
केंद्र सरकारने, कच्च्या तागाच्या व्यापाराच्या बाजारातील गतीशीलतेचे काळजीपूर्वक परीक्षण केल्यानंतर कच्च्या तागाच्या निश्चित केलेल्या TD5 श्रेणीसाठी 30 सप्टेंबर 2021 रोजी तागाच्या गिरण्यांकरीता आणि इतर अंतिम वापरकर्त्यांद्वारे कच्च्या तागाच्या खरेदीच्या दरावरील मर्यादा 6500/- रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली होती.
ताग आयुक्त कार्यालय औपचारिक आणि अनौपचारिक स्त्रोतांद्वारे कच्च्या तागाच्या किमतीची माहिती संकलित करत होते आणि सध्याचे दर निर्धारित दराच्या जवळ असल्याचे त्यांना आढळून आले. कच्च्या तागाचे सध्याचे भाव सुमारे रु. 6500/- असल्याने सरकारने ही मर्यादा हटवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून दिनांक 20 मे 2022 पासून त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात होईल.
सुमारे 40 लाख ताग शेतकऱ्यांव्यतिरिक्त 7 लाखांहून अधिक लोक ताग व्यापारावर अवलंबून आहेत,म्हणून दराची मर्यादा हटवण्याच्या या निर्णयाचा शेतकरी, गिरण्या आणि तागाच्या क्षेत्रातील सूक्ष्म,लघु आणि उद्योग क्षेत्राला लाभ होईल अशी अपेक्षा आहे. दराची मर्यादा हटवण्याच्या निर्णयाचा तागाच्या तयार उत्पादनांच्या निर्यातीलाही फायदा होईल ज्याची किंमत उद्योगाच्या उलाढालीच्या दृष्टीने सुमारे 30% आहे.
* * *
S.Patil/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1826753)
आगंतुक पटल : 210