शिक्षण मंत्रालय

'स्वराज्यापासून नव-भारतापर्यंतच्या भारताच्या संकल्पनांचा आढावा' या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केले उद्घाटन

Posted On: 19 MAY 2022 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 मे 2022

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथे दिल्ली विद्यापीठाने आयोजित केलेल्या 'स्वराज्यपासून नव-भारतापर्यंतच्या भारताच्या संकल्पनांचा आढावा' या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन केले. दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाच्या स्मरणार्थ विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे या तीन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश सिंह यांच्यासह अनेक मान्यवर या उद्घाटन सोहोळ्यात उपस्थित होते.

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दिल्ली विद्यापीठ आपले शताब्दी वर्ष साजरे करत आहे ही अतिशय समाधानाची बाब आहे असे धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडवला जात आहे आणि आपल्या देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तंत्रज्ञान आपले जग झपाट्याने कसे बदलत आहे याबद्दलही त्यांनी सांगितले आणि 21 व्या शतकातील आव्हानांसाठी भारताला सज्ज करण्याकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जात आहे अशी माहितीही त्यांनी दिली. त्यांनी सुचवले की दिल्ली विद्यापीठाने ब्लॉकचेन, ई-कॉमर्स, पेटंट व्यवस्थापन इत्यादीसारख्या उदयोन्मुख आणि महत्त्वाच्या क्षेत्रांवर अभ्यासक्रम विकसित करण्याच्या दिशेने काम करावे. केवळ भारताचीच नव्हे तर जगातील आव्हाने सोडवण्याची क्षमता दिल्ली विद्यापीठाकडे आहे, असेही ते म्हणाले.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826725) Visitor Counter : 125