भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) सनोती प्रॉपर्टीज एलएलपीला, मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमधे समभाग अधिग्रहण करायला दिली मान्यता

Posted On: 19 MAY 2022 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 मे 2022

 

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) स्पर्धा कायदा, 2002 च्या कलम 31(1) अंतर्गत मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (मॅग्मा एचडीआय/टार्गेट) कडून सनोती प्रॉपर्टीज एलएलपीच्या (सनोती/अ‍ॅक्वायरर) समभाग अधिग्रहणास मान्यता दिली आहे.

प्रस्तावित एकत्रिकीकरण  हे सनोती द्वारे मॅग्मा एचडीआयच्या एकूण समभाग भांडवलाच्या 55.39% चे अधिग्रहण आहे. यानुसार लक्ष्याच्या काही समभागाचे प्रस्तावित सबस्क्रिप्शनद्वारे आणि पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे असलेल्या, निर्धारित लक्ष्याच्या ठराविक समभागांचे एकाचवेळी अधिग्रहण करणे यात अंतर्भूत आहे.

सनोती हे व्यावसायिक आणि निवासी बांधकाम प्रकल्पांच्या  व्यवसायात सक्रीय आहेत.

मॅग्मा एचडीआय भारतातील विमा व्यवसायात सक्रीय असून जनरल इन्शुरन्स आणि इतर उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणींचा व्यवसाय करते.

सीसीआयचा तपशीलवार आदेश नंतर येईल.
 

* * *

S.Patil/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1826667) Visitor Counter : 206


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu