भारतीय स्पर्धा आयोग
भारतीय स्पर्धा आयोगाने सीरम इंस्टीट्यूट लाइफ सायन्सेसद्वारे बायोकॉन बायोलॉजिक्सच्या सुमारे 15% समभाग अधिग्रहणासाठी बायोकॉन बायोलॉजिक्समधे कोविशील्ड टेक्नॉलॉजीजच्या विलीनीकरणाला दिली मान्यता
Posted On:
19 MAY 2022 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2022
भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) सीरम इंस्टीट्यूट लाइफ सायन्सेसद्वारे बायोकॉन बायोलॉजिक्सच्या सुमारे 15% समभाग अधिग्रहणासाठी बायोकॉन बायोलॉजिक्समधे कोविशील्ड टेक्नॉलॉजीजच्या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे.
प्रस्तावित संयोजनामध्ये कोविशील्ड टेक्लॉनॉलिज प्रायव्हेट लिमिटेडचे (सीटीपीएल) विलीनीकरण समाविष्ट आहे. सीरम इन्स्टिट्यूट लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडची (अधिग्रहणर्ता) पूर्ण मालकीची उपकंपनी बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेड (लक्ष्य) मध्ये ती समाविष्ट आहे. अधिग्रहणकर्ता यात सुमारे 15% सुमारे समभाग प्राप्त करेल.
अधिग्रहणकर्ता ही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी आहे. कोविड-19 प्रतिबंधक लस आणि उपचारांच्या पुढील विकासासाठी आणि व्यापारीकरणासाठी कंपनी म्हणून ती स्थापन करण्यात आली आहे. इतर संसर्गजन्य रोगांविरुद्ध लस विकसित करण्याचीही कंपनीची योजना होती. सध्या, अधिग्रहणकर्ता स्वतःची उत्पादन सुविधा स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आहे.
सीटीपीएल ही अधिग्रहणकर्त्याची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. प्रस्तावित व्यवहाराच्या अनुषंगाने ती लक्ष्यात विलीन केली जाईल. लस, औषधे आणि इतर फार्मास्युटिकल उत्पादनांचे विपणन, विक्री आणि वितरणाचा व्यवसाय करण्यासाठी त्याचा समावेश करण्यात आला होता.
लक्ष्यित कंपनी ही बायोकॉन लिमिटेडची उपकंपनी आहे. मधुमेह, ऑन्कोलॉजी, नेफ्रोलॉजी, कर्करोग आणि स्वयंप्रतिकार रोग यांसारख्या जुनाट आणि तीव्र आजारांवर ती उपचार सुविधा देते. लक्ष्यित कंपनीची बेंगळुरू आणि चेन्नई येथे संशोधन आणि विकास केंद्रे देखील आहेत. मोनोक्लोनल ऍन्टीबॉडीज, रीकॉम्बीनंट प्रथिने आणि इन्सुलिनसाठी बेंगळुरू आणि मलेशियामध्ये कंपनीच्या उत्पादन सुविधा आहेत.
* * *
S.Thakur/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826650)
Visitor Counter : 214