माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सेंट ट्रोपेझ इथे महाराजा रणजितसिंह आणि राजकुमारी बन्नू पान देई यांना अर्पण केली पुष्पांजली
प्रविष्टि तिथि:
18 MAY 2022 10:13PM by PIB Mumbai
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज सेंट ट्रोपेझ इथल्या अलर्ड स्क्वेअरला भेट दिली. कान पासून बोटीने जाता येऊ शकेल इतक्या अंतरावर असलेल्या सेंट ट्रोपेझचे हिमाचल प्रदेशाशी नाते आहे.
सेंट ट्रोपेझच्या भेटीदरम्यान, अनुराग ठाकूर यांनी महाराजा रणजितसिंह (शीख साम्राज्याचे पहिले महाराजा ), जीन फ्रान्कोइस एलर्ड (महाराजा रणजितसिंह यांच्या सैन्यातले जनरल) आणि त्यांची पत्नी, चंबाची राजकुमारी बन्नू पान देई यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. राजकुमारी बन्नू पान देई यांचा जन्म हिमाचल प्रदेशातल्या चंबा इथे झाला होता.

चार पिढ्यानंतरही सेंट ट्रोपेझचा भारताशी असलेला दुवा अद्याप कायम असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. राजकुमारीच्या कुटुंबियांनी भारतीय मूळ जपले असून त्यांना सेंट ट्रोपेझमध्ये अतिशय आदर दिला जातो.

सेंट ट्रोपेझ इथे आगमन झाल्यानंतर सेंट ट्रोपेझच्या महापौर, सिल्व्ही सिरी आणि उप महापौर एलर्ड फ्रेडरिक यांनी, माजी उप महापौर हेन्री प्रीव्होस्ट एलर्ड यांच्यासह अनुराग ठाकूर यांचे स्वागत केले. अनुराग ठाकूर यांनी महापौर आणि उप महापौरांना गोव्यातल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला भेट देण्यासाठी आमंत्रित केले आणि हिमाचलच्या पर्वतरांगापासून ते गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत सैर घडवून आणण्याचे आश्वासनही दिले.

यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी महापौर आणि सेंट ट्रोपेझ मधल्या इतर मान्यवरांचे हिमाचलची पारंपरिक टोपी आणि शाल देऊन सत्कार केला.

***
ST/NC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1826624)
आगंतुक पटल : 175