संरक्षण मंत्रालय
संरक्षण क्षेत्रातल्या निवृत्तीवेतनधारकांनी त्यांची ओळख पटवण्यासंबंधी कागदपत्रे (हयातीचा दाखला ) सादर करण्याची वार्षिक प्रक्रिया 25 मे पर्यंत पूर्ण करण्याचे संरक्षण मंत्रालयाचे आवाहन
Posted On:
18 MAY 2022 5:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 मे 2022
संरक्षण क्षेत्रातल्या ज्या निवृत्तिवेतनधारकांनी अद्याप त्यांची ओळख पटवण्यासंबंधी कागदपत्रे / हयातीचा दाखला सादर करण्याची वार्षिक प्रक्रिया पूर्ण केलेली नाही , त्यांनी येत्या 25 मे 2022 पर्यंत ती पूर्ण करावी असं आवाहन संरक्षण मंत्रालयाने पुन्हा एकदा केले आहे, ज्यायोगे त्यांची मासिक निवृत्ती वेतन देय प्रक्रिया सुरळीत सुरु राहील.
17 मे 2022 पर्यंत प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी केली असता असे लक्षात आले आहे की System for Pension Administration (RAKSHA) (SPARSH) या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या 43 हजार 774 निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन किंवा त्यांच्या संबंधित बँकांमार्फत देखील अद्याप हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
या शिवाय, जुन्या निवृत्तीवेतनधारकांसाठी (2016 पूर्वीचे निवृत्त कर्मचारी) जे निवृत्तीवेतनाच्या जुन्या प्रणालीवर आहेत अशा सुमारे 1 लाख 20 हजार निवृत्तीवेतनधारकांनी उपलब्ध असलेल्या कोणत्याही माध्यमाद्वारे त्यांची वार्षिक ओळख प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826396)
Visitor Counter : 244