आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 191.65 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.21 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली


भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 15,647

गेल्या 24 तासात 1,829 नव्या रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.57%

Posted On: 18 MAY 2022 9:41AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 191.65 (1,91,65,00,770) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,40,27,137 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.21 (3,21,04,984) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,06,245

2nd Dose

1,00,30,914

Precaution Dose

50,51,545

FLWs

1st Dose

1,84,17,814

2nd Dose

1,75,67,731

Precaution Dose

82,40,927

Age Group 12-14 years

1st Dose

3,21,04,984

2nd Dose

1,26,95,005

Age Group 15-18 years

1st Dose

5,90,43,240

2nd Dose

4,42,58,800

Age Group 18-44 years

1st Dose

55,66,73,638

2nd Dose

48,55,34,576

Precaution Dose

4,67,605

Age Group 45-59 years

1st Dose

20,31,58,302

2nd Dose

18,98,14,448

Precaution Dose

10,60,603

Over 60 years

1st Dose

12,70,26,040

2nd Dose

11,83,26,423

Precaution Dose

1,66,21,930

Precaution Dose

3,14,42,610

Total

1,91,65,00,770

 


भारतातील रुग्णसंख्या सध्या 15,647 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.
 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे. गेल्या 24 तासात 2,549 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,87,259 झाली आहे.

गेल्या 24 तासात 1,829 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 4,34,962 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.49 (84,49,26,602) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.57% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.42% आहे.


 
***

ST/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826229) Visitor Counter : 122