आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 191.48 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 3.19 कोटींपेक्षा जास्त मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 16,400

गेल्या 24 तासात 1,569 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.59%

Posted On: 17 MAY 2022 9:22AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 191.48 (1,91,48,94,858)  कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,39,87,395 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.19 (3,19,02,564) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 


आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,06,192

2nd Dose

1,00,30,311

Precaution Dose

50,38,561

FLWs

1st Dose

1,84,17,715

2nd Dose

1,75,66,304

Precaution Dose

82,09,929

Age Group 12-14 years

1st Dose

3,19,02,564

2nd Dose

1,23,55,548

Age Group 15-18 years

1st Dose

5,90,04,371

2nd Dose

4,41,24,835

Age Group 18-44 years

1st Dose

55,66,27,525

2nd Dose

48,51,29,159

Precaution Dose

4,41,938

Age Group 45-59 years

1st Dose

20,31,49,960

2nd Dose

18,97,21,219

Precaution Dose

10,31,610

Over 60 years

1st Dose

12,70,19,279

2nd Dose

11,82,61,637

Precaution Dose

1,64,56,201

Precaution Dose

3,11,78,239

Total

1,91,48,94,858

 

भारतात सक्रीय रुग्णभार सध्या  16,400 इतका आहे,तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतका आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% आहे.गेल्या 24 तासांत 2,467 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,84,710 झाली आहे.


गेल्या 24 तासात 1,569 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,57,484  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.44 (84,44,91,640)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.59% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.44% आहे.




***

S.Thakur/S.Patgaonkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825971) Visitor Counter : 172