ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्राने गहू खरेदीचा हंगाम वाढवला, राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि भारतीय अन्न महामंडळ यांना गहू खरेदी 31 मे पर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश
Posted On:
15 MAY 2022 7:28PM by PIB Mumbai
केंद्राने गहू खरेदीची अंतिम मुदत लवकर संपणाऱ्या गहू उत्पादक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 31 मे 2022 पर्यंत खरेदी सुरू ठेवण्यास सांगितले आहे. अन्न आणि सार्वजनिक पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भारतीय अन्न महामंडळाला केंद्रीय साठ्या अंतर्गत गहू खरेदी सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. वाढीव कालावधीमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांद्वारे खरेदी प्रक्रिया सुरू ठेवण्याच्या केलेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गुजरात, बिहार आणि राजस्थान या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये रब्बी विपणन हंगाम 2022-23 मध्ये केंद्रीय साठ्या अंतर्गत गव्हाची खरेदी सुरळीतपणे सुरू आहे.
मुख्यत्वे किमान हमीभावापेक्षा जास्त बाजारभावामुळे मागील रब्बी विपणन हंगाम 2021-22 च्या तुलनेत रब्बी विपणन हंगाम 2022-23 दरम्यान केंद्रीय साठ्या अंतर्गत गहू खरेदी कमी झाली आहे, ज्यामध्ये शेतकरी खासगी व्यापार्यांना गहू विकत आहेत. केंद्र सरकारने 13 मे रोजी गव्हाच्या चढ्या किंमतीला लगाम घालण्यासाठी अपरिवर्तनीय पत हमी पत्रे आणि शेजारील/अन्नधान्य तुटवडा असलेल्या देशांच्या विनंती वगळता गहू निर्यात प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला होता.
14.05.2022 पर्यंत, 36,208 कोटी रुपये मूल्याच्या किमान हमीभावासह 180 लाख मेट्रिक टन (रब्बी विपणन हंगाम 2021-22 दरम्यान 367 लाख मेट्रिक टन ची संबंधित खरेदी) गव्हाची खरेदी करण्यात आली असून सुमारे 16.83 लाख शेतकर्यांना याचा लाभ झाला आहे.
State
|
Closing date for Procurement of wheat
|
|
|
Punjab
|
31.05.2022
|
|
Haryana
|
31.05.2022
|
|
Uttar Pradesh
|
15.06.2022
|
|
Madhya Pradesh
|
15.06.2022
|
|
Bihar
|
15.07.2022
|
|
Rajasthan
|
10.06.2022
|
|
Uttarakhand
|
30.06.2022
|
|
Delhi
|
31.05.2022
|
|
Gujarat
|
15.06.2022
|
|
Himachal Pradesh
|
15.06.2022
|
|
Jammu & Kashmir
|
31.05.2022
|
|
***
N.Chitale/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825585)
Visitor Counter : 234