सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त, 16 ते 20 मे या कालावधीत आठवडाभर साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या  वतीने ‘संग्रहालयांचे सामर्थ्य'  या संकल्पनेअंतर्गत  अनेक शैक्षणिक उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन

Posted On: 15 MAY 2022 5:34PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करण्यासाठी, संग्रहालय संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषदेने (आयसीओएम) नमूद केल्यानुसार, नवी दिल्लीतली राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या  वतीने संग्रहालयांचे सामर्थ्यया संकल्पनेअंतर्गत  अनेक शैक्षणिक उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 1977 पासून दरवर्षी, संग्रहालय संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषद, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन (आयएमडी) आयोजित करत आहे. हा आंतरराष्ट्रीय संग्रहालय समुदायासाठी एक अनोखा कार्यक्रम असतो.  'सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतीचे संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य, सहकार्य आणि शांतता विकसित करण्यात महत्त्वाचे साधन म्हणून संग्रहालय निभावत असलेल्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे' हा या दिवसाचा उद्देश आहे.

राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय  16 ते 20 मे 2022 पर्यंत वर नमूद केलेल्या संकल्पनेसह  आठवडाभर कार्यक्रम आयोजित करणार आहे.  भारतीय कलेतील आधुनिक कलाकृतींवर  केंद्रित असणारी हस्तांतरण आणि क्षेत्रज्ञ नावाची दोन मुख्य प्रदर्शने आयोजित करण्यात आली असून 18 मे रोजी प्रमुख पाहुणे म्हणून संस्कृती, पर्यटनईशान्य प्रदेश विकास मंत्री  जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते या प्रदर्शनांचे उद्घाटन होईल. संस्कृती मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन आणि सहसचिव  लिली पांडे या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असतील.

भारत आणि ब्राझील यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाच्या अंतर्गत,16 मे 2022 रोजी 'ब्राझिलिया आणि आधुनिक ब्राझीलची उभारणी' या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यावेळी  केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह  पुरी प्रमुख पाहुणे म्हणून आणि संस्कृती राज्यमंत्री मीनाक्षी लेखी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

या कार्यक्रमांव्यतिरिक्त, मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, सेल्फीसाठी उत्सुक असलेल्यांसाठी फोटो बूथ ठेवण्यात येणार आहेत. 16-20 मे 2022 या कालावधीत संग्रहालय अधिक वेळ खुले राहील आणि अभ्यागतांकडून कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी, कृपया येथे लिहा: राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, जयपूर हाऊस, इंडिया गेट- 110003, ईमेल: dgngma[at]gmail[dot]com

कार्यक्रमांबद्दल अधिक तपशीलवार माहितीसाठी, खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1825553) Visitor Counter : 194