सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दिल्लीतील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इथे खादी उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन
Posted On:
11 MAY 2022 8:57PM by PIB Mumbai
खादी कापड आणि कपड्यांच्या श्रेणीत वैविध्य आणून आणि गुणवत्ता दर्जा उंचावण्यासाठी खादी संस्थांचे कौशल्य वाढवून खादीला अधिक लोकाभिमुख बनवण्याचा प्रयत्न करत, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने खादी उत्कृष्टता केंद्राच्या (CoEK) स्थापनेसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) सोबत सहयोग केला आहे. नवी दिल्लीतील खादी उत्कृष्टता केंद्र हब आणि गांधीनगर, शिलाँग, कोलकाता आणि बेंगळुरू येथील त्याच्या शाखांचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नवी दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी संकुलात करण्यात आले. मंत्र्यांच्या हस्ते खादी उत्कृष्टता केंद्राचे संकेतस्थळ देखील सुरू करण्यात आले ज्यावर खादी संस्थांच्या वापरासाठी नवीनतम डिझाइन आणि तंत्रज्ञान उपक्रम अपलोड केले जातील.
यावेळी बोलताना राणे म्हणाले की, देशाच्या विकासात योगदान देण्यात आणि “आत्मनिर्भर भारत” चे उद्दिष्ट पूर्ण करण्यात खादीची मोठी जबाबदारी आहे आणि त्याच बरोबर खादीमध्ये नवनवीन डिझाईन्स सादर करून त्याकडे तरुण वर्गाला आकर्षित करण्याची जबाबदारी डिझायनर्सची आहे. “भारतीय फॅशन उद्योगातील इतर आघाडीच्या वस्त्रप्रावरणांच्या तुलनेत खादीच्या लोकप्रियतेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. आमच्या डिझायनर्सनी खादीमध्ये अशा आकर्षक डिझाईन्स आणायला हव्यात की लोकांना इतर कपड्यांप्रमाणेच खादी खरेदी करण्याचा मोह होईल,” ते म्हणाले.
एमएसएमई राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा, वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना विक्रम जरदोश, एमएसएमई सचिव बी बी स्वेन आणि वस्त्रोद्योग सचिव यूपी सिंह हे देखील यावेळी उपस्थित होते.
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824536)
Visitor Counter : 215