उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी मोदी संकल्पनेचा केला उलगडा, कारणमीमांसा करत गुणवैशिष्ट्ये केली अधोरेखित


अनोखा अनुभवात्मक प्रवास आणि कार्य, उत्कटता आणि ऊर्जा, लोकांच्या संघर्षांची सखोल जाण, मोठी स्वप्नं पाहण्याची आणि मोठा विचार करण्याची धाडसी वृत्ती, दृढनिश्चय हे मोदींना यशस्वी बनवतात: व्यंकय्या नायडू यांचे प्रतिपादन

भारताच्या मोठ्या पटावर कल्याणकारी आणि विकासात्मक उपक्रमांचा विस्तार करण्यापूर्वी गुजरातमध्ये प्रयोग करण्याऱ्या मोदी यांना शास्त्रज्ञ म्हणून संबोधले

आश्वासने, कामगिरी आणि आश्वासनांची पूर्तता हे  मोदींचे ‘आशेचे राजकारण’ असल्याचे प्रतिपादन

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताची दखल घेतली जात असून त्याचा आदर केला जात आहे

केवळ अंमलबजावणीत दिरंगाई आणि संथ प्रगती याच गोष्टींचा पंतप्रधानांना तिटकारा

‘Modi @ 20 : Dreams Meet Delivery’ या पुस्तकाचे प्रकाशन

Posted On: 11 MAY 2022 4:19PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित नेते असल्याचे उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

मोदी यांच्या गुणवैशिष्ट्यांची कारणमीमांसा करत मोदी संकल्पनेचा त्यांनी आज विस्तृत उलगडा केला.  ‘Modi @ 20 : Dreams Meet Delivery’ या पुस्तकाचे त्यांनी प्रकाशनही केले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून 20 वर्षे विविध क्षेत्रात मोदी यांच्या विचार आणि कामगिरीचे विविध पैलू समोर आणणारे 21 लेखांचे यात 22 तज्ञांनी केलेले संकलन आहे.

मोदींची मानसिकता, कार्यपद्धती आणि दूरदृष्टीचा त्यांनी आपल्या 35 मिनिटांच्या विवेचनात धांडोळा घेतला. आधी गुजरातचे आणि आता पंतप्रधान म्हणून संपूर्ण भारताचे हित जोपासणारे मोदी हे अनोखे नेते असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.

पंतप्रधानांच्या यशाला अधोरेखित करणार्‍या गुणांचा नायडू यांनी सूचीबद्धरित्या संदर्भ दिला:

1. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी घर सोडल्यानंतर सामाजिक-सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून 'स्व'चा शोध आणि जनता तसेच देशासाठी केलेला मोदी यांचा सुरुवातीचा प्रायोगिक व्यापक प्रवास;

2. भारतीय आणि भारत यांच्या संघर्षांची सखोल माहिती आणि त्यांच्या क्षमतेची जाण;

3. वैयक्तिक आणि भारताच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे;

4. मोठे स्वप्न पाहण्याचे धैर्य आणि संकल्पाचे सिद्धीमध्ये रूपांतर करण्याचा दृढनिश्चय;

5. मोठा विचार करणे आणि व्यापक कार्य करणे;

6. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता;

7. तात्पुरते अपयश आणि तात्कालिक धक्क्यांबाबत अविचल राहणे;

8. उत्कटता, ऊर्जा आणि कठोर परिश्रम;

9. वेगळ्या पद्धतीने विचार आणि कृती करणे;

10. संकटाचे संधीत रूपांतर करणे;

11. लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी धोरण तयार करणे आणि अंमलबजावणी करताना शेवटच्या घटकापासून काम करण्याच्या पध्दतीचा अवलंब करणे;

12. तपशिलांचा शोध आणि समस्या आणि परिणामांचे सर्वसमावेशक मूल्यांकन;

13. राष्ट्रीय स्तरावर पुराव्यावर आधारित धोरणे आणि कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी गुजरात प्रयोगांचे अनुभव आणि परिणामांचा वापर;

14. प्रभावी प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा व्यापक अवलंबआणि

15. ‘परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ (कामगिरी, सुधारणा आणि परिवर्तन) या मंत्राचा उत्कट प्रचार.

पंतप्रधानांच्या सर्वोत्कृष्ट आणि परिवर्तनवादी नेतृत्वाचा उल्लेख करून नायडू म्हणाले; मोदी हे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक असे उल्लेखनीय व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे भारताची दखल घेतली जात आहे आणि आदर केला जात आहे हे त्यांचे विरोधक देखील मान्य करतात.

गुजरातचे मुख्यमंत्री होण्याआधीच्या त्यांच्या दीर्घकालीन अनुभवात्मक वाटचालीतून मोदींचा दृष्टिकोन साकार होत आहे, असे सांगून उपराष्ट्रपतींनी भर दिला की, हाच मूलभूत फरक आहे जो मोदींना अनेक प्रकारे अद्वितीय बनवतो. एवढा अनुभवात्मक प्रवास कदाचित समकालीन दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा नसेल. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांची देशासाठीची दृष्टी ही सुरवातीला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि नंतर राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांच्या कार्यकाळात जमा झालेल्या असंख्य अनुभवांची अभिव्यक्ती आणि प्रकटीकरण आहे.

केंद्रीय नगरविकास मंत्री या नात्याने पंतप्रधानांसोबत यापूर्वी केलेल्या कामाचे स्मरण करून, नायडू यांनी मजबूत आणि यशस्वी नियोजन आणि अंमलबजावणी सक्षम करण्याकरिता प्रत्येक मुद्द्याच्या तपशीलासाठी मोदींच्या उत्सुकतेबाबत  माहिती दिली. विशेषतः स्वच्छ भारत मोहिमेला एक नियमित सरकारी कार्यक्रम, पंतप्रधानांच्या सर्व उपक्रमांना दर्शवणारे तत्त्वज्ञान म्हणून पाहण्याऐवजी लोकचळवळबनवण्याच्या मोदींच्या वचनबद्धतेवर नायडू यांनी प्रकाश टाकला.

उपराष्ट्रपती म्हणाले की, भारत मोठ्या संख्येने मोठ्या समस्यांनी ग्रासलेला आहे याची जाणीव असल्याने, पंतप्रधान मोदी मोठ्या प्रमाणात आणि वेगाने योजना कार्यान्वित करतात आणि परिणामी दुर्गम भागात 45 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत; गरिबांना सन्मानाने जगता यावे म्हणून 12 कोटींहून अधिक शौचालये आणि 3 कोटी घरे बांधण्यात आली आहेत; ऐकिवात नसलेले उद्योजक घडवण्यासाठी 5 कोटी मुद्रा कर्ज मंजूर केली आहेत; तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून थेट लाभ हस्तांतरण द्वारे 320 योजनांतर्गत लाभार्थ्यांना 20 कोटीहून अधिक रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत; गरीब महिलांना स्वयंपाकघरासाठी लाकूड वापरण्याच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी 8 कोटी एलपीजी सिलिंडर आणि 19 कोटी कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे.

नायडू यांनी पंतप्रधानांचे वर्णन यापूर्वी यशस्वीपणे राबवलेल्या विविध योजनांचा विस्तार करणारे शास्त्रज्ञम्हणून केले, जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना निकालांवर आधारित आणि त्याद्वारे पुराव्यावर आधारित प्रकल्प आणि योजना तयार करण्यास सक्षम होते.

मोदींना 'निवडणूक यंत्र' म्हणून संबोधले जात असल्याचा उल्लेख करून, नायडू यांनी नमूद केले की, मोदींसाठी निवडणुका हे राजकारणाचे परिणाम नाहीत तर सामान्य लोकांच्या जीवनातील संदर्भांचे सखोल आकलन आणि मोदींना यशस्वी प्रचारक बनवणाऱ्या त्यांच्या आकांक्षांची सखोल माहिती असलेले सामाजिक विज्ञान आहे.

येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत लोकांची चेतना जागृत करत, दिलेली आश्वासने पूर्ण करत, लोकांच्या आशा आणि आकांक्षाची पूर्तता करणारा नेता असल्याचे सांगत, देशातील लोकशाही पध्दती प्रगल्भ करण्यासाठी श्री.मोदी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल श्री.नायडू यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केली. जनतेची भंगलेली  स्वप्ने सांधणारे आणि भारताला पुनश्च समृद्धीकडे नेणारे नेता म्हणून जनता श्री मोदींकडे पाहत आहे, असे सांगून श्री नायडू यांनी मोदींच्या राजकारणाचे वर्णन 'आशा' असे केले.

उपराष्ट्रपतींनी पुढे नमूद केले, की "पंतप्रधान श्री मोदी यांची क्षमता, गतिशीलता आणि स्थिरता (लोकसभेत आवश्यक बहुमतासह) ही भारताला समृद्धीकडे घेऊन जात आहे." श्री मोदी धोरणे आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी गतीशील आहेत,कारण भारताला स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षातही विकासात्मक उणिवा भेडसावत आहेत आणि त्यातील तफावत भरून काढण्यासाठी श्री. मोदी उत्सुक आहेत,असे प्रतिपादन श्री नायडू यांनी केले.

श्री. नायडू म्हणाले की मोदी म्हणजेविकसित भारत बनवण्याचे अभियानच (Mission Of Making Of  Developed India,MODI) आहे आणि विविध राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या सर्व पक्षांनी देशाला पुढे आणण्यासाठी उपलब्ध विकासात्मक आणि लोकशाही व्यासपीठांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी  केले. हे कार्य पूर्ण करण्यासाठी सर्व तणावातून मुक्त होऊन देशात शांततापूर्ण वातावरण सुनिश्चित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, श्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री, डॉ. एस. जयशंकर, इतर ज्येष्ठ मंत्रीगण, संसद सदस्य, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

***

S.Patil/V.Ghode/V.Joshi/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824488) Visitor Counter : 202