राष्ट्रपती कार्यालय

तीन देशांच्या राजदूतांनी राष्ट्रपतींना सादर केली परिचयपत्रे

Posted On: 11 MAY 2022 3:27PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (11 मे 2022) राष्ट्रपती भवनात स्लोव्हाक प्रजासत्ताक, सुदान प्रजासत्ताक आणि नेपाळच्या राजदूतांनी सादर केलेली परिचयपत्रे स्वीकारली.

1. रॉबर्ट मॅक्सियन, स्लोव्हाक प्रजासत्ताकचे राजदूत

2. अब्दल्ला ओमेर बशीर अलहुसेन, सुदान प्रजासत्ताकचे राजदूत

आणि

3. डॉ शंकर प्रसाद शर्मा, नेपाळचे राजदूत

यांनी आपली परिचयपत्र सादर केली.

परिचयपत्र सादर केल्यानंतर राष्ट्रपतींनी तिन्ही राजदूतांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भारताचे या देशांसोबत असलेले सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध तसेच या प्रत्येक देशाचे भारतासोबत असलेले बहुआयामी संबंध अधोरेखित केले. राष्ट्रपतींनी त्यांना द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी यश मिळण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या देशातील नागरिकांच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपतींनी उच्चायुक्त आणि राजदूतांमार्फत त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना वैयक्तिक शुभेच्छाही दिल्या. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राजदूतांनी भारतासोबतचे संबंध दृढ करण्यासाठी एकत्रित काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

***

S.Tupe/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1824408) Visitor Counter : 148