आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील नव्या बाह्य रुग्ण/आंतररुग्ण विभागांचे उद्घाटन
चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा केवळ आजारांवरील उपचारांपुरत्या मर्यादित नसतात. तर त्या सामाजिक न्यायाला प्रोत्साहन आणि उत्तेजन देखील देतात : केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार
Posted On:
09 MAY 2022 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2022
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयातील, बहु-विशेषता सुविधांनी युक्त असलेल्या, अत्याधुनिक बाह्य रुग्ण/आंतररुग्ण विभागांचे उद्घाटन केले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार या देखील या वेळी उपस्थित होत्या.

या नव्या आंतर रुग्ण विभागामुळे लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयाची सध्याची 877 खाटांची क्षमता वाढणार असून आता रुग्णांसाठी एक हजारहून अधिक खाटांची सोय होणार आहे. अनेक वैद्यकीय शाखांतील विशेष उपचारांची सोय उपलब्ध करून देणाऱ्या नव्या अत्याधुनिक बाह्य रुग्ण विभागात सर्व वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया विषयक विशेष सुविधा, आयुर्वेद, योगा आणि निसर्गोपचार तसेच होमिओपॅथी उपचार पद्धतीची सोय असणार आहे.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले की देशाने “प्रतिका’त्मक दृष्टीकोनाकडून “परिपूर्ण” दृष्टीकोनाकडे वाटचाल केली आहे.

देशाच्या राजधानीतील सर्वात जुन्या वैद्यकीय महाविद्यालयात उपस्थित राहता आल्याबद्दल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “या वैद्यकीय महाविद्यालयाला शतकाहून अधिक कालावधीचा इतिहास आहे. या संस्थेने मोठी वाटचाल केली आहे आणि काळाबरोबर संस्थेची अधिक प्रगती होत आहे. चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा केवळ आजारांवरील उपचारांपुरत्या मर्यादित नसतात. त्या सामाजिक न्यायाला प्रोत्साहन आणि उत्तेजन देखील देतात. गरीब रुग्णांना किफायतशीर दरात उत्तम दर्जाचे उपचार मिळतात तेव्हा त्यांचा सरकारी यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होत जातो”

* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823887)