युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हिमाचल प्रदेशमधल्या सिरमौरमधल्या माजरा येथे हॉकी अॅस्ट्रोटर्फची पायाभरणी

Posted On: 08 MAY 2022 7:47PM by PIB Mumbai

 

हिमाचल प्रदेशातल्या लोकांमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी नैसर्गिक गुणवत्ता आहे आणि या गुणवत्तेचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहेअसे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशमधल्या सिरमौरमधल्या माजरा येथे सांगितले. इथल्या सरकारी उच्च  माध्यमिक विद्यालयामध्ये हॉकी अॅस्ट्रोटर्फच्या पायाभरणी कार्यक्रमामध्ये ते आज बोलत होते.

 

 

या हॉकी टर्फसाठी सहा कोटी रूपये खर्च करण्यात येणार असून त्यामध्ये खेळाडू मुलींसाठी वसतिगृह, इतर आवश्यक कक्ष, प्रसाधन गृहे, प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे सांगून ठाकूर यांनी, गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने  राज्याच्या विविध भागामध्ये टॅलेंट हंटसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येवू शकतील, असे सांगितले. आगामी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धां 2021 मध्ये गटका, कलारीपयट्टू, थांग-ता, मल्लखांब आणि योगासन या पाच पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. तसेच या खेळांना जागतिक व्यासपीठावर लोकप्रिय करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे नमूद केले. राज्यांमध्येही  पारंपरिक खेळांची ओळख तयार करता येऊ शकेल, असे मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले. पोंता साहिब येथे इनडोअर स्टेडियम बांधण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यंदा बंगलुरू येथे अलिकडेच झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये दोन राष्ट्रीय विक्रम आणि विद्यापीठ स्पर्धांमधले याआधीचे 76 विक्रम मोडले गेले, यावरून आपल्या युवकांमध्ये असलेली क्रीडा प्रतिभा दिसून येते, असे ठाकूर म्हणाले.

जिल्हा रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते शिल्लई तहसीलमधल्या कोटा गावातल्या कुलदीप सिंग या दिव्यांगाला स्कूटी भेट देण्यात आली.

दोन दिवसांच्या दौ-यावर आलेल्या क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये अनेक कार्यक्रम झाले. अनुराग ठाकूर यांनी शनिवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल आणि इतर मान्यवरांसह पंचकुला (हरियाणा) येथे इंद्रधनुष सभागृहामध्ये खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2021 च्या बोधचिन्हाचे तसेच  क्रीडा-स्पर्धागीतशुभंकर आणि स्पर्धांच्या जर्सीचे अनावरण केले. यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय)च्या पंजाबातल्या पतियाळा येथे नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली.

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1823683) Visitor Counter : 213