सांस्कृतिक मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उद्या कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल मध्ये मुक्ती-मातृका (‘मातेच्या रूपात स्वातंत्र्य’) या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत
Posted On:
05 MAY 2022 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2022
गृह व्यवहार आणि सहकार मंत्री, अमित शहा उद्या कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या मुक्ती-मातृका (‘मातेच्या रूपात स्वातंत्र्य’) या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे इतर मान्यवरांसह या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
मुक्ति-मातृकामध्ये प्रख्यात ओडिसी नृत्यांगना डोना गांगुली आणि सहकलाकार दीक्षा मंजरी यांचे नृत्य सादरीकरण आणि नामांकित संगीतकार जोडी, सौरेंद्रो-सौम्योजित यांचे वादन सादर होईल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे, या कार्यक्रम मालेत तेथील लोकांच्या गौरवशाली इतिहासाचे, संस्कृतीचे आणि कर्तृत्वाचे स्मरण म्हणून ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे.
युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत बंगालच्या दुर्गा पूजेचा समावेश आणि 2021-22 मध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.
शुक्रवार, 6 मे 2022 रोजी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलच्या सेंट्रल हॉलमध्ये संध्याकाळी 6:00 ते 7:00 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823059)