आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 189.48 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 2.95 कोटींपेक्षा जास्त मुलांना लसीचा पहिली मात्रा देण्यात आली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,509

गेल्या 24 तासात 3,205 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.76%

Posted On: 04 MAY 2022 9:17AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 189.48 (1,89,48,01,203) कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,34,46,113 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 2.95 (2,95,09,889) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.


आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10405389

2nd Dose

10019349

Precaution Dose

4850346

FLWs

1st Dose

18416165

2nd Dose

17544616

Precaution Dose

7737218

Age Group 12-14 years

1st Dose

29509889

2nd Dose

8040467

Age Group 15-18 years

1st Dose

58557194

2nd Dose

42656237

Age Group 18-44 years

1st Dose

555870205

2nd Dose

479587735

Precaution Dose

206637

Age Group 45-59 years

1st Dose

202952436

2nd Dose

188322961

Precaution Dose

653681

Over 60 years

1st Dose

126888817

2nd Dose

117337981

Precaution Dose

15243880

Precaution Dose

2,86,91,762

Total

1,89,48,01,203

 

भारतात सक्रीय रुग्णभार सध्या 19,509 इतका आहे, तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.05% इतका आहे.

 

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% आहे.गेल्या 24 तासांत 2,802 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,44,689 झाली आहे.

 

 

गेल्या 24 तासात 3,205 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

 

गेल्या 24 तासात एकूण 3,27,327 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.89 (83,89,55,577) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.76% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.98% आहे.

 

****

ST/SP/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1822547) Visitor Counter : 167