उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
02 MAY 2022 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2022
उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी ईद-उल-फित्रच्या शुभ प्रसंगी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा संदेश खालीलप्रमाणे आहे-
“मी ईद-उल-फित्रच्या शुभ प्रसंगी आपल्या देशातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर ईद-उल-फित्र हा ईश्वराप्रति प्रामाणिक श्रद्धा , परोपकार आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.
मला आशा आहे की हा सण उदारतेची भावना मजबूत करेल आणि लोकांना एकमेकांच्या जवळ आणेल, त्यांना मैत्री, बंधुता, प्रेम आणि परस्पर आदराच्या सूत्रात बांधेल.
ईद-उल-फित्रशी निगडित पवित्र आणि उदात्त मूल्ये आपले जीवन शांतता , सौहार्द आणि आनंदाने समृद्ध करो.”
उपराष्ट्रपतींच्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतील संदेशासाठी येथे क्लिक करा
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1822098)
आगंतुक पटल : 190