ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

नॅशनल ओपन ऍक्सेस रजिस्ट्री (NOAR) 'लाईव्ह' उपलब्ध


आंतर-राज्य पारेषण प्रणाली स्वयंचलित पेमेंट गेटवेमध्ये अल्पकालीन खुला प्रवेश उपलब्ध

Posted On: 02 MAY 2022 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2022

 

नॅशनल ओपन ऍक्सेस रजिस्ट्री (NOAR) 1 मे 2022 पासून यशस्वीरित्या लाइव्ह उपलब्ध झाली आहे. NOAR हे एकात्मिक एक खिडकी  इलेक्ट्रॉनिक मंच  म्हणून डिझाईन केले आहे जे ओपन ऍक्सेस सहभागी, व्यापारी, पॉवर एक्स्चेंज, राष्ट्रीय/प्रादेशिक/राज्य भर प्रेषण  केंद्रांसह सर्व संबंधितांसाठी  अल्प-कालीन  ओपन ऍक्सेस ऍप्लिकेशन  इलेक्ट्रॉनिक प्रक्रियांसाठी  उपलब्ध आहे. यामुळे आंतर-राज्य पारेषण प्रणालीत अल्प-कालीन  खुल्या ऍक्सेसचे प्रशासन स्वयंचलित होईल.

एनओएआर (NOAR)  मंच  RLDCs किंवा SLDCs द्वारे जारी केलेल्या स्थायी मंजुरी आणि ओपन ऍक्सेस ग्राहकांना दिलेला अल्प-कालीन  खुला प्रवेश इत्यादीसह आंतर-राज्य पारेषणात अल्पकालीन खुल्या प्रवेशाशी संबंधित माहितीचे भांडार म्हणून काम करेल आणि ही  माहिती संबंधितांना ऑनलाईन  उपलब्ध करून देईल. पेमेंट करण्यासाठी प्रदान केलेले पेमेंट गेटवे  NOAR सह एकत्रित केल्यामुळे  आर्थिक हिशेब  आणि अल्प-कालीन  खुल्या प्रवेश व्यवहारांचा मागोवा घेणे सुलभ होईल.

पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (POSOCO) द्वारे संचालित राष्ट्रीय भार प्रेषण केंद्र (NLDC) ला NOAR च्या अंमलबजावणी आणि परिचालनासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले  आहे. गतिमान  वीज बाजारपेठ  सुलभ करण्यासाठी आणि ग्रीडमध्ये अक्षय ऊर्जा (RE) संसाधनांचे एकत्रीकरण सक्षम करण्यासाठी NOAR उपयुक्त ठरेल.  NOAR मुळे संपूर्ण भारतातील मागणीच्या सुमारे 10% असलेल्या अल्प-कालीन  वीज  बाजारपेठेत सुलभ आणि जलद प्रवेशासह ग्राहकांचा बाजारपेठेतील सहभाग वाढेल.

NOAR हा भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचा एक भाग आहे आणि आंतर-राज्य पारेषणातील खुल्या प्रवेशाची  5 वी  दुरुस्ती नियमन कार्यान्वित करून केंद्रीय वीज नियामक आयोगाने आवश्यक नियामक चौकट  अधिसूचित केली आहे

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1822047) Visitor Counter : 128