रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नितीन गडकरी यांच्या हस्ते हैद्राबादमध्ये 8000 कोटी रुपये खर्चाच्या आणि 460 किमी लांबीच्या 12 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे आणि 7 सीआरआयएफ प्रकल्पांचे उद्घाटन

Posted On: 29 APR 2022 3:59PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2022 

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज हैद्राबादमध्ये  8000 कोटी रुपये खर्चाच्या  460 किलोमीटर लांबीच्या 12 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे 7 सीआरआयएफ प्रकल्पांचे उद्घाटन  करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग, वेमुला प्रशांत रेड्डी, खासदार, आमदार, आणि मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामध्ये 8000 कोटींची गुंतवणूक करून 460 किलोमीटरचे मार्ग तयार करण्यात आले असून यामुळे तेलंगणा ते महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत वेगवान  प्रवास करणे शक्य होणार असून आंतरराज्य संपर्क व्यवस्था अधिक चांगली होणार आहे. जलदगती महामार्ग विकासामुळे या प्रदेशातल्या व्यापाराला चालना मिळेल तसेच युवकांसाठी  शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अत्याधुनिक आणि सुरक्षित राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार केल्यामुळे हैद्राबाद आणि तेलंगणामधल्या लोकांच्या सामाजिक, आर्थिक समृद्धीवर त्याचा मोठा प्रभाव पडेल.


* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821272) Visitor Counter : 153