संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सातपैकी सहा नवीन संरक्षण कंपन्यांना व्यवसायामध्ये पहिल्या सहामाहीत अंतरिम नफा


कंपन्यांची 8,400 कोटी रूपयांपेक्षा जास्त उलाढाल

Posted On: 29 APR 2022 2:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2022 

 

विजया दशमीदिनी म्हणजेच दि. 15 ऑक्टोबर, 2021 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आलेल्या सात नवीन संरक्षण कंपन्यांपैकी सहा कंपन्यांनी व्यवसायाच्या प्रारंभीच्या सहा महिन्यामध्ये, 1ऑक्टोबर, 2021 ते 31 मार्च, 2022 या काळात अंतरिम नफा नोंदवला आहे. यंत्र इंडिया लिमिटेड(वायआयएल) ही कंपनी वगळता उर्वरित सर्व कंपन्यांनी पहिल्या सहामाहीत अंतरिम नफा नोंदवला आहे. नफा कमावणा-या कंपन्यांमध्ये  मुनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल), आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड (अवनी), अॅडव्हान्स्ड वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड (एडब्ल्यूईइंडिया), ट्रूप कम्फटर्स लिमिटेड (टीसीएल), इंडिया ऑप्टेल लिमिटेड (आयओएल) आणि ग्लायडर्स इंडिया लिमिटेड   (जीआयएल) यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी कमावलेल्या नफ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

(रूपये कोटीमध्ये)

S No

New Defence Company

Avg six monthly Profit(+)/Loss(-) during the last three years

Provisional Profit(+) / Loss(-)

(Oct 01, 2021 – Mar 31, 2022)

1

MIL

-677.33

28

2

AVNL

-164.33

33.09

3

IOL

-5.67

60.44

4

YIL

-348.17

-111.49

5

AWEIL

-398.5

4.84

6

GIL

-43.67

1.32

7

TCL

-138.17

26

 

कॉर्पोरेट संस्थांप्रमाणे व्यवसाय चालवण्यासाठी सरकारने या नवीन संरक्षण कंपन्यांना  आवश्यक सहाय्य देण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. या नवीन कॉर्पोरेट कंपन्यांना प्रदान करण्यात आलेल्या कार्यात्मक आणि आर्थिक स्वायतत्तेमुळे सरकारच्या मदतीने आयुध निर्मिती कंपन्यांच्या कार्याने नवीन वळण घेतले आहे.

या कंपन्यांनी स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच नवीन बाजारपेठांचा शोध घेऊन, आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यास प्रारंभ केला. यामध्ये निर्यातीचाही समावेश होता. त्यामुळे अगदी अल्प काळामध्ये या कंपन्यांनी देशांतर्गत 3,000 कोटी आणि निर्यातीच्या 600 कोटींच्या मालाची मागणी नोंदवून घेतली.एमआयएलने 500 कोटी रूपयांचा दारूगोळा निर्यात करण्याची सर्वात मोठी ऑर्डर मिळवली आहे. या कंपन्या ‘इन-हाउस’ तसेच सहयोगी कंपन्यांच्या मदतीने नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी कार्यरत आहेत. वायआयएलला भारतीय रेल्वेसाठी अक्सेलस पुरविण्याची सुमारे 251 कोटींची ऑर्डर मिळाली आहे.

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे, सरकारने 16 जून, 2021 रोजी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये असलेल्या आयुध निर्माण कारखाना मंडळाचे व्यावसायिक व्यवस्थापन असणाऱ्या  सात सरकारी मालकीच्या कॉर्पोरेट कंपन्यात रुपांतर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. संरक्षण विषयक उत्पादनांचे व्यावसायीकरण हा प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षित असलेला निर्णय घेऊन सरकारने या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणण्यात पुढाकार घेतला आहे. 


* * *

N.Chitale/Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1821243) Visitor Counter : 291