आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 188.65 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12- 14 वयोगटातल्या मुलांना 2कोटी 82 लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या

भारतामध्‍ये सध्या कोविड सक्रिय रूग्णसंखया 17,801 आहे.

गेल्या 24 तासात 3,377 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.74 %

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.63 %

Posted On: 29 APR 2022 9:32AM by PIB Mumbai

नवी दिल्ली – दि.29 एप्रिल, 2022

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,  भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्‍ये देण्‍यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने   188 कोटी 65 लाख (1,88,65,46,894) मात्रांचा टप्पा पार केला आहे. देशभरामध्‍ये 2,32,59,791 सत्रांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्‍यात आले.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2 कोटी 82लाखांपेक्षा  अधिक (2,82,92,856) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे कालपासून म्हणजेच 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे .

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10405037

2nd Dose

10015488

Precaution Dose

4776656

FLWs

1st Dose

18415554

2nd Dose

17537837

Precaution Dose

7543790

Age Group 12-14 years

1st Dose

28292856

2nd Dose

5762258

Age Group 15-18 years

1st Dose

58369646

2nd Dose

42075577

Age Group 18-44 years

1st Dose

555673416

2nd Dose

477624547

Precaution Dose

135295

Age Group 45-59 years

1st Dose

202912093

2nd Dose

187837144

Precaution Dose

482399

Over 60 years

1st Dose

126859484

2nd Dose

117023262

Precaution Dose

14804555

Precaution Dose

2,77,42,695

Total

1,88,65,46,894

 

 

 भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 17,801 इतकी आहे. हे प्रमाण भारतात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांच्या  0.04% इतके  आहे.

 

गेल्या 24 तासांत भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.74  % इतका आहे.  2,496  कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून )  4,25,30,622  झाली आहे.

 

 

गेल्या 24 तासात  3,377 नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

गेल्या 24 तासांमध्‍ये कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 4,73,635 चाचण्‍या करण्यात आल्या. आत्तापर्यंत भारतामध्‍ये एकूण 83.69 कोटींपेक्षा जास्त (83,69,45,383) चाचण्‍या करण्‍यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.63% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील 0.71%  इतका नोंदला गेला आहे.

 

****

JaydeviPS/SB/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1821183) Visitor Counter : 171