विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
‘सल्लागार विकास केंद्र’(CDC) आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या, ‘वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)’ यांचे मनुष्यबळ, जंगम संपत्ती आणि जबाबदाऱ्यांसह दोन्ही विभागांचे विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
27 APR 2022 9:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत, खालील गोष्टींना मंजुरी देण्यात आली:
- सीडीसीचे सध्या असलेले 13 कर्मचारी, सीएसआरआर मध्ये 13 अतिरिक्त जागा निर्माण करुन त्यात सामावून घेतले जातील.
- सीडीसी चे कार्यालय सध्या नवी दिल्लीत इंडिया हॅबिटॅट सेंटर मध्ये आहे, ती जागा रिक्त करुन त्यांना परत दिली जाईल, आणि इतर कोणाला तरी ती जागा दिली जाईल. या जागेच्या वितरणाच्या व्यवहारातून मिळालेला निधी, देशाच्या एकत्रित तिजोरीत जमा केला जाईल.
- विलिनीकरणानंतर सीडीसीच्या सर्व जंगम (हलवता येण्यासारखी) मालमत्ता आणि जबाबदाऱ्या देखील सीएसआयआर कडे वर्ग करता येतील.
निर्णयाचा परिणाम :
या दोन संस्थांच्या विलिनीकरणामुळे, या विभागांची कार्यपद्धती अधिक सूत्रबद्ध तर होईलच; त्याशिवाय, पंतप्रधानांच्या किमान सरकार कमाल प्रशासन या तत्वाला अनुसरून असेल. सीएसआयआर ला शिक्षण, तंत्रज्ञान निर्यात अशा क्षेत्रात सल्लागार म्हणून सीडीसीच्या अनुभवी कर्मचाऱ्यांचा लाभ मिळेल. या विलिनीकरणातून सीएसआयआर ला गरजेचे असलेले खालील मूल्यवर्धन होणार आहे.
- प्रकल्पांचे तंत्रज्ञान- व्यावसायिक मूल्यांकन
- सीएसआयआर तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोगाचा सामाजिक-आर्थिक परिणाम
- CSIR तंत्रज्ञानावर आधारित प्रोटोटाइपच्या विकासासाठी तपशीलवार डिझाइन आणि अभियांत्रिकी करण्यासाठी योग्य सल्लागारांची निवड आणि भागधारकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि/किंवा बाजार सज्जतेसाठी CSIR तंत्रज्ञानाचे योग्य अन्वयार्थ लावणे
- व्यवसाय वाढविणाऱ्या कृती
पार्श्वभूमी:
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग (DSIR) अंतर्गत CSIR आणि CDC या दोन स्वतंत्र स्वायत्त संस्था आहेत.
14 व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारे, नीती आयोगाने विविध सरकारी विभागांतर्गत स्वायत्त संस्थांचा आढावा घेतला. नीती आयोगाच्या पुनरावलोकन समितीच्या 10व्या, 13व्या आणि 18व्या बैठकीत या दोन संस्था, CSIR आणि CDC चा आढावा घेण्यात आला. त्यानंतर, सीडीसी ही संस्था, सीएसआयआर मध्ये विलिन करण्यात यावी आणि तिच्यामध्ये पुरेशी क्षमता असल्याने ती पुढे सुरू ठेवावी अशी शिफारस करण्यात आली.
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1820751)
Visitor Counter : 185