आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 187.71कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 2.66 कोटींपेक्षा जास्त मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 16,522

गेल्या 24 तासात 2,541 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.54%

Posted On: 25 APR 2022 7:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2022

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 187.71 (1,87,71,95,781)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,30, 40, 984 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.66 (2,66,55, 947) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून  18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 4,17,414 जणांना वर्धक मात्रा देण्‍यात आली.

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404769

2nd Dose

10012236

Precaution Dose

4698351

FLWs

1st Dose

18415022

2nd Dose

17532487

Precaution Dose

7361461

Age Group 12-14 years

1st Dose

26655947

2nd Dose

2983166

Age Group 15-18 years

1st Dose

58151729

2nd Dose

41393756

Age Group 18-44 years

1st Dose

555492517

2nd Dose

475580091

Precaution Dose

92265

Age Group 45-59 years

1st Dose

202884711

2nd Dose

187395613

Precaution Dose

325149

Over 60 years

1st Dose

126839711

2nd Dose

116740697

Precaution Dose

14236103

Precaution Dose

2,67,13,329

Total

1,87,71,95,781

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 16,522 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.04% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे.गेल्या 24 तासांत 1,862 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,21,341झाली आहे.

गेल्या 24 तासात 2,541 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,02,115 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.50 (83,38,25,991)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.54% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.84% आहे.

 

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1819935) Visitor Counter : 128