पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यात आभासी माध्यमातून बैठक

Posted On: 11 APR 2022 11:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यात आज आभासी माध्यमातून बैठक झाली.

भारत-अमेरिका 2+2 मंत्रिस्तरीय चर्चेसाठी वॉशिंग्टन डीसी येथे गेलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर हेदेखील व्हाईट हाऊसमध्ये त्यांचे अमेरिकी समपदस्थ, संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन आणि परराष्ट्र व्यवहार  मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्यासमवेत या बैठकीच्या दरम्यान उपस्थित होते.

कोविड-19 महामारी, जागतिक आर्थिक सुधारणा, हवामान बदलासंदर्भात कृती, दक्षिण आशिया आणि हिंद - प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि युक्रेनमधील परिस्थिती यासारख्या अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर उभय नेत्यांनी व्यापक विचार विनिमय केला.

अलीकडच्या वर्षांत द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचाही त्यांनी आढावा घेतला.

भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट केल्याने दोन्ही देशांना अत्यंत फायदा होईल आणि यामुळे जागतिक शांतता, समृद्धी आणि  स्थैर्याला हातभार लागेल यावरही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

 

 

 

 

 

S.Kulkarni/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1819032) Visitor Counter : 153