गृह मंत्रालय

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या 13 व्या स्थापन दिवस सोहोळ्यात आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

Posted On: 21 APR 2022 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2022

आजचा दिवस एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेसोबतच केंद्रीय गृह मंत्रालयासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण राष्ट्रीय तपास यंत्रणा देशाच्या अंतर्गत सुरक्षेसारखे अतिमहत्त्वाचे क्षेत्र अत्यंत तत्परतेने आणि दक्षतेने सांभाळत आहे आणि त्या बाबतीत प्रगती करत आहे.  

एनआयएने 90 टक्क्याहून अधिक  गुन्हेसिद्धतेच्या यशासह ‘सुवर्ण लक्ष्ये’ निश्चित केली आहेत आणि पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली दहशतवाद मुक्त भारताची संकल्पना आणि दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्सचे लक्ष्य प्रत्यक्षात साकार करण्यात एनआयएची फार मोठी भूमिका आहे.  

ज्या गुन्ह्यांमध्ये साक्षी पुरावे मिळणे अवघड असते अशा प्रकरणांची तपासणी एनआयएला करावी लागते मात्र तरीही या संस्थेने गुन्ह्यांची उकल करण्याचे जे प्रमाण गाठले आहे ते  देशभरातील पोलीस आणि सर्व दहशतवाद विरोधी यंत्रणांसाठी एक प्रेरणा स्त्रोत आहे आणि यासाठी मी संपूर्ण एनआयए परिवाराचे अभिनंदन करतो.

दहशतवादापेक्षा मोठे मानवाधिकारांचे उल्लंघन असूच शकत नाही आणि म्हणून मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी दहशतवादाचे समूळ उच्चाटन आवश्यक आहे. एनआयएला दहशतवाद निपटून काढण्यासाठी दृढनिश्चयाने कार्य करावे लागेल.

एनआयएमधील अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे आज दहशतवाद्यांना पैसा पुरविणाऱ्या मार्गांना चाप बसला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जे कार्यकर्ते होते त्यांच्यावर एनआयएने अनेक गुन्हे नोंदविले आणि त्यांचे स्लीपर सेल उध्वस्त करण्याच्या बाबतीत मोठे यश मिळविले आहे.

केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री आज नवी दिल्ली येथे झालेल्या एनआयएच्या 13व्या स्थापना दिवस सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एनआयएच्या अधिकाऱ्यांना यावेळी केंद्रीय गृह मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा आणि निशिथ प्रामाणिक यांच्यासह एनआयएचे महासंचालक, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि एनआयएचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधून केलेल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की आजचा दिवस राष्ट्रीय तपास यंत्रणेसह केंद्रीय गृह मंत्रालयासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे कारण राष्ट्रीय तपास यंत्रणा देशाच्या अंतर्गत सुरक्षेसारखे अतिमहत्त्वाचे क्षेत्र अत्यंत तत्परतेने आणि दक्षतेने सांभाळत आहे आणि त्या बाबतीत प्रगती करत आहे. ज्या गुन्ह्यांमध्ये साक्षी पुरावे मिळणे अवघड असते अशा प्रकरणांची तपासणी एनआयएला करावी लागते, मात्र तरीही या संस्थेने गुन्ह्यांची उकल करण्याचे जे प्रमाण गाठले आहे ते  देशभरातील पोलीस आणि सर्व दहशतवाद विरोधी यंत्रणांसाठी एक प्रेरणा स्त्रोत आहे आणि यासाठी मी संपूर्ण एनआयए परिवाराचे अभिनंदन करतो असे ते यावेळी म्हणाले.

अमित शाह म्हणाले की कोणत्याही संस्थेसाठी 13 वर्षांचा काळ ही बाल्यावस्था असते, पण देशाचा गृहमंत्री या नात्याने मी हे निश्चितपणे सांगू शकतो कि अत्यंत कमी काळात एनआयएने 90 टक्क्याहून गुन्हेसिद्धतेच्या यशासह ‘सुवर्ण लक्ष्ये’ निश्चित केली आहेत आणि पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली दहशतवाद मुक्त भारताची संकल्पना आणि दहशतवादाविरुद्ध शंभर टक्के झिरो टॉलरन्सचे लक्ष्य प्रत्यक्षात साकार करण्यात एनआयएची फार मोठी भूमिका आहे. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की मी संपूर्ण एनआयए परिवाराला खात्री देऊ इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार दहशतवादाविरुद्ध  झिरो टॉलरन्सचे धोरण  स्वीकारून पुढे जात आहे. या प्रवासात एनआयएला लागेल ती मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, कोणत्याही सभ्य समाजासाठी दहशतवाद एखाद्या अभिशापासमान आहे, जगात या अभिशापाची सर्वात मोठी वेदना आपल्या देशाने भोगली आहे. दहशतवादापेक्षा मोठे दुसरे मानवाधिकारांचे उल्लंघन असूच शकत नाही आणि म्हणून मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी दहशतवादाचे समूळ उच्चाटन आवश्यक आहे. एनआयएला दहशतवाद निपटून काढण्यासाठी दृढनिश्चयाने कार्य करावे लागेल असे त्यांनी सांगितले. गेल्या 7 वर्षांमध्ये एनआयएने अत्यंत आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करून दाखवली आहे याबद्दल प्रशंसा करत केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, या बाबतीत जम्मू काश्मीरचा विशेष उल्लेख करावा लागेल. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढणे ही एक कामगिरी आहे पण दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे ही वेगळी गोष्ट आहे. आणि जर दहशतवाद मुळापासून उध्वस्त करायचा असेल तर, यासाठी पैसा पुरविणारी संपूर्ण यंत्रणा नष्ट करावी लागेल.मोदी यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर एनआयएने दहशतवादाला पैसा पुरविण्याच्या बाबतीत जे गुन्हे दाखल केले त्यामुळे जम्मू काश्मीरमधील दहशतवाद निपटून काढण्याच्या दिशेने मोठी मदत झाली आहे असे केंद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले.

एनआयए अर्थात राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या सतर्कतेमुळे आज दहशतवाद्यांना पैसे पुरवण्याचे मार्ग काबूत ठेवण्यात आले आहेत, एनआयएने जम्मू-काश्मीरमध्ये काम करणाऱ्या दहशतवाद्यांच्या हस्तकांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल केले आहेत आणि त्यांना भूमिगत राहून मदत करणाऱ्यांचा बिमोड करण्यात मोठे काम केले आहे. 2018 आणि 2019 मध्ये एनआयएने प्रथमच नोंदवलेल्या खटल्यांमुळे आज दहशतवाद्यांना पैसे पुरवण्याचे सोपे मार्ग राहिलेले नाहीत. यामुळे दहशतवादाला मदत करणाऱ्या आणि समाजात सन्मानाने जगणाऱ्यांच्या लॉजिस्टिक आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा या दोघांवरही मोठा फटका बसला आहे. एनआयएने अशा सर्व लोकांना आज त्यांची ओळख उघड करण्यास भाग पाडले आहे आणि त्यांना कायद्याच्या न्यायालयात धाडले आहे. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी आणि दारुगोळा आणि रसद पुरवठा करण्याच्या प्रकरणांमध्येही एनआयएने लक्ष घातले आहे आणि काही प्रकरणे विशेषत: दहशतवाद्यांना निधी पुरवठा तसेच डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी संघटनांच्या निधी पुरवठा प्रकरणांची पाळेमुळे खणून काढण्याचे काम एनआयएकडे सोपवण्यात आले आहे आणि जम्मू-काश्मीरप्रमाणे त्यांना यातही मोठे यश मिळेल अशी अपेक्षा आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवठ्याशी संबंधित 105 प्रकरणे नोंदवण्यात आली, 876 आरोपींविरुद्ध 94 आरोपपत्रे दाखल करण्यात आली, 796 आरोपींना अटकही करण्यात आली आणि त्यापैकी 100 आरोपींना दोषीही ठरवण्यात आले, ही मोठी कामगिरी आहे.

अमित शाह  म्हणाले की, दहशतवादाशी संबंधित सर्व माहिती सर्व राज्यांच्या पोलीस आणि एजन्सींसोबत सामायिक करण्यात समन्वय प्रस्थापित करणे, दहशतवादविरोधी कायदे मजबूत आणि निश्चित करणे, दहशतवादविरोधी यंत्रणांना बळ देणे तसेच दहशतवादी प्रकरणांमध्ये 100% दोष सिद्ध करण्याचे ध्येय ठरवणे हे सरकारचे प्रयत्न आहेत. या चार स्तंभांवर दहशतवादविरोधी अभियान प्रगती करू शकते आणि मला आनंद आहे की या चार स्तंभांवर एनआयए ची प्रगती चांगली झाली आहे. ते म्हणाले की, मुंबई दहशतवादी हल्ला ही अशीच एक घटना होती ज्यानंतर राष्ट्रीय दहशतवादविरोधी यंत्रणा तयार करण्यात आली, किनारी सुरक्षेसाठीही एक योजना तयार करण्यात आली, दहशतवादाला निधी पुरवठा करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा जागरूक झाल्या, दहशतवादाच्या तपासातही गुणात्मक सुधारणा झाली आहे. तसेच गुप्तचर यंत्रणा आणि बुद्धिमत्तेचा योग्य वेळी अचूक वापर करण्यासाठी अत्यंत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आले आहेत. ते म्हणाले की, देशभरातील पोलीस आणि सर्व यंत्रणांनी या भ्याड हल्ल्यातून धडा घेत आज दहशतवादविरोधी अभियान मजबूत केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, एनआयएची स्थापना होऊन 13 वर्षे झाली आहेत, या काळात 400 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, 349 हून अधिक प्रकरणांमध्ये पुरावे सादर करण्यात आले आहे, सुमारे 2,494 गुन्हेगार पकडले गेले आहेत, 391 जणांना शिक्षा देण्यात यश मिळाले आहे आणि आरोप सिद्ध करण्याचे प्रमाण 93.25 टक्के आहे, ही कामगिरी अभिनंदनास पात्र आहे. ते म्हणाले की एनआयए अधिक सशक्त आणि मजबूत व्हावे आणि एनआयएला जगभरात दहशतवादविरोधी यंत्रणा म्हणून स्वीकारले जावे. ते म्हणाले की, आम्ही एनआयए कायदा आणि यूएपीए कायदा मजबूत करण्याचे काम केले आहे. शाह  म्हणाले की त्यांनी एक अतिशय महत्त्वाचे दुरुस्ती विधेयक आणले, त्यानंतर एनआयएला अनेक प्रकारचे अधिकार मिळाले. भारताबाहेरील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यात जिथे भारतीयांची जीवितहानी झाली असेल, तिथे तपासाचे अधिकार एनआयएला देण्यात आले आहेत आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणा म्हणूनही मान्यता मिळावी या उद्देशाने एनआयएने आता ते सिद्ध केले पाहिजे. नव्या दुरुस्तीमध्ये घुसखोरी, स्फोटक पदार्थ आणि सायबर गुन्ह्यांचे अधिकारही आम्ही एनआयएला दिले आहेत. यापूर्वी एनआयएला दहशतवादी संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याचा अधिकार होता, आता भारतात प्रथमच आम्ही एनआयएला संघटनांबरोबरच व्यक्तींनासुद्धा दहशतवादी घोषित करण्याचा अधिकार दिला आहे आणि आतापर्यंत 36 जणांना दहशतवादी घोषित केले आहे, ही एक नवीन प्रकारची सुरुवात आहे.

अमित शाह  म्हणाले की, देशातील पोलिस तपास पद्धतीत आमूलाग्र बदल व्हायला हवा, आता तपास थर्ड डिग्रीवर अवलंबून नसून डेटा आणि माहितीच्या डिग्रीवर अवलंबून आहे.

 

 

R.Aghor/S.Chitnis/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818836) Visitor Counter : 436