अर्थ मंत्रालय
अटल निवृत्तीवेतन योजनेची एकूण नोंदणी 4 कोटींहून अधिक
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अटल निवृत्तीवेतन योजनेत 99 लाखांहून अधिक खात्यांची नोंदणी
Posted On:
21 APR 2022 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2022
अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मार्च 2022 पर्यंत एकूण सदस्य नोंदणी 4.01 कोटीहून अधिक झाली आहे त्यापैकी अटल निवृत्तीवेतन योजनेची 99 लाखांहून अधिक खाती आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये उघडण्यात आली होती. सर्व श्रेणीतील बँकांच्या सक्रिय सहभागामुळे या योजनेला अभूतपूर्व यश मिळाले. सुमारे 71% नोंदणी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे, 19% प्रादेशिक ग्रामीण बँकांद्वारे, 6% खासगी क्षेत्रातील बँकांद्वारे, 3% पेमेंट आणि लघु वित्त बँकांनी केली आहे.
अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत 31 मार्च 2022 पर्यंत एकूण नोंदणीपैकी, जवळपास 80% सदस्यांनी 1000 रुपयाच्या निवृत्तीवेतन योजनेची आणि 13% सदस्यांनी 5000 रुपयाच्या निवृत्तीवेतन योजनेची निवड केली आहे. अटल निवृत्तीवेतन योजनेच्या एकूण सदस्यांपैकी 44% महिला सदस्य आहेत तर 56% पुरुष सदस्य आहेत. तसेच, अटल निवृत्तीवेतन योजनेच्या एकूण सदस्यांपैकी 45% हे 18 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत.
अटल निवृत्तीवेतन योजना ही निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे प्रशासित भारत सरकारची हमी निवृत्तीवेतन योजना आहे. ही योजना 18-40 वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकाला बचत बँक खाते असलेल्या बँक किंवा टपाल कार्यालयाच्या शाखांमधून सामील होण्याची परवानगी देते. या योजनेअंतर्गत, सदस्याला त्याच्या योगदानानुसार 60 वर्षांच्या वयापासून दरमहा 1000 ते 5000 रु. पर्यंत किमान हमी निवृत्तीवेतन मिळेल. सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला आणि सदस्य आणि त्याचा जोडीदार या दोघांच्या मृत्यूनंतर ग्राहकाच्या वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत जमा झालेली निवृत्तीवेतन संपत्ती नामनिर्देशित व्यक्तीला परत केली जाईल.
R.Aghor/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1818793)
Visitor Counter : 221