श्रम आणि रोजगार मंत्रालय

मार्च 2022 साठी कृषी आणि ग्रामीण श्रमिकांसाठी अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक, जाहीर

Posted On: 21 APR 2022 4:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2022

मार्च 2022 या  महिन्यासाठी कृषी आणि ग्रामीण श्रमिकांसाठी अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकांत (बेस: 1986-87 = 100) 3 अंकांनी वाढ झाली असून तो अनुक्रमे 1098 वर, आणि 1109 अंकांवर पोहोचला आहे, कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी निर्देशांकात झालेली ही वाढ, ही  कपडे, बिछाने आणि वहाणा यांत अनुक्रमे 1.04 आणि 1.44 अंकांनी झालेल्या वाढीमुळे असून  सारी कॉटन (मिल),धोती कॉटन (मिल),शर्टींग कॉटन (मिल), प्लॅस्टिकच्या वहाणा/बूट इत्यादींमधील किंमतीत झालेल्या वाढीमुळे आहे.

16 राज्यांत ग्रामीण श्रमिकांसाठी झालेली वाढ 2ते10 अंकांची आहे तर 4 राज्यांत 3 ते 10अंकांनी घट झाल्याची नोंद झाली आहे. तमिळनाडूमध्ये ग्रामीण श्रमिकांसाठी सामान्य निर्देशांकाने 1270 अंकांसह वाढ नोंदवत उच्च स्तर गाठला तर 926 गुणांसह हिमाचल प्रदेश सर्वात खालच्या स्तरावर आहे.

कृषी श्रमिकांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकांत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक (प्रत्येकी 10 गुण) वाढ नोंदली गेली आणि ग्रामीण श्रमिकांसाठी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान राज्यांत (प्रत्येकी 10 गुणांनी) वाढ नोंदली गेली,याचे कारण मुख्यत्वे गव्हाचे पीठ,बाजरी, शेळीचे मांस,दूध, शेंगदाणा तेल, मिरच्या (हिरव्या/सुक्या),सारी कॉटन (मिल),धोती कॉटन (मिल),शर्टींग कॉटन (मिल), प्लॅस्टिकच्या वहाणा/बूट,पितळेची भांडी,मातीची भांडी यांच्यात झालेली मूल्यवाढ हे आहे.

Group

Agricultural Labourers

Rural  Labourers

 

Feb.,2022

March,2022

Feb.,2022

March,2022

General Index

1095

1098

1106

1109

Food

1026

1025

1033

1032

Pan, Supari,  etc.

1903

1914

1913

1924

Fuel & Light

1213

1222

1208

1216

Clothing, Bedding  &Footwear

1132

1147

1164

1179

Miscellaneous

1160

1168

1163

1172

 

 

 

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818736) Visitor Counter : 134