संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' साध्य करण्यासाठी संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकन कंपन्यांना भारतात संयुक्तरित्या संशोधन आणि विकास, संरक्षण उपकरणांची निर्मिती आणि देखभाल करण्यासाठी केले आमंत्रित

Posted On: 21 APR 2022 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2022

संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकन कंपन्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाअंतर्गत भारत सरकारने घेतलेल्या धोरणात्मक उपक्रमांचा लाभ घेण्याचे आणि 'मेक इन इंडिया,मेक फॉर द वर्ल्ड'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संयुक्तपणे संशोधन आणि विकास करण्याचे तसेच संरक्षण उपकरणांची निर्मिती आणि देखभाल करण्याचे आवाहन केले आहे. आज दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया (AMCHAM India) च्या सदस्यांना त्यांच्या 30 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संरक्षणमंत्री दृकश्राव्य माध्यमाद्वारे संबोधित करत होते. सह-उत्पादन, सह-विकास, गुंतवणूक प्रोत्साहन आणि दुरुस्ती सुविधांचा विकास आणि देखभाल यासाठी अमेरिकी  कंपन्यांना त्यांनी भारतात आमंत्रित केले. 

सध्याच्या काळात काही अमेरिकन कंपन्यांनी ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ हे आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय उद्योगासोबत भागीदारी करून त्यांचा स्थानिक सहभाग वाढवला आहे.आम्हाला विश्वास आहे,की ही फक्त एक सुरुवात आहे.वाढत जाणाऱ्या व्यवसायामुळे, आम्ही अमेरिकेतील कंपन्यांकडून भारतात गुंतवणूक होण्याची आकांक्षा बाळगत आहोत.भारतात उत्पादन सुविधा स्थापन करण्यासाठी येणाऱ्या अमेरिकन कंपन्यांचे आम्ही स्वागत करतो आहोत, असे राजनाथ सिंह म्हणाले.

प्रमुख मूळ उपकरण उत्पादक (OEMs) आणि भारतीय कंपन्यांमधील भागीदारी सुलभ करण्यासाठी सरकारने घेतलेल्या अनेक उपक्रमांचा संरक्षणमंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला. थेट विदेशी गुंतवणूकीच्या (एफडीआय) मर्यादेत वाढ करण्यापासून ते व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्यापर्यंत आणि आयडीईएक्स (iDEX) मंचाद्वारे नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यापासून ते भारत स्थित कंपन्यांच्या आणि संयुक्त उपक्रमांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सकारात्मकता वाढविण्यापर्यंत, सरकार संरक्षण उत्पादनांत भारतीय कंपन्यांद्वारे होणाऱ्या  निर्यातीचा हिस्सा वाढवण्यावर भर देत आहे- असे ते म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांनी वॉशिंग्टनमध्ये नुकत्याच झालेल्या भारत-अमेरिका 2+2 मंत्रिस्तरीय संवादाला सकारात्मक आणि फलदायी असे संबोधत, पुढे सांगितले की, संरक्षण क्षेत्र हे द्विपक्षीय संबंधांचा एक सामर्थ्यशाली आणि वृध्दिंगत होणारा आधारस्तंभ आहे. भारत आणि अमेरिका  परस्परातील  संबंध  लाभदायी करण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी एकमेकांच्या सामर्थ्याचा उपयोग करून घेण्यासाठी सज्ज आहेत, असे ते म्हणाले.

भारत-अमेरिका आर्थिक संबंध हे 21 व्या शतकातील व्यावसायिक अर्थपूर्ण संबंधांचे एक उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

 सीईटीचे (CET) परवडणारे उपयोजन आणि व्यापारीकरण सक्षम करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा सरकारचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

 

 

 

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1818677) Visitor Counter : 271