आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 187.07 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 2.53 कोटींपेक्षा जास्त बालकांचे लसीकरण

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 13,433

गेल्या 24 तासात 2,380 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.43%

Posted On: 21 APR 2022 9:52AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 187.07 (1,87,07,08,111)  कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,28,80,254 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 2.53 (2,53,87,677) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 2,37,279 जणांना क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यात आली. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10404554

2nd Dose

10010217

Precaution Dose

4645225

FLWs

1st Dose

18414633

2nd Dose

17529032

Precaution Dose

7237718

Age Group 12-14 years

1st Dose

25387677

2nd Dose

1247298

Age Group 15-18 years

1st Dose

58005588

2nd Dose

40877009

Age Group 18-44 years

1st Dose

555377471

2nd Dose

474148203

Precaution Dose

52080

Age Group 45-59 years

1st Dose

202868175

2nd Dose

187093461

Precaution Dose

185199

Over 60 years

1st Dose

126827755

2nd Dose

116547222

Precaution Dose

13849594

Precaution Dose

2,59,69,816

Total

1,87,07,08,111

 

 

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 13,433 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,231 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,25,14,479 झाली आहे. 

 

गेल्या 24 तासात 2,380 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

 

 

गेल्या 24 तासात एकूण 4,49,114 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 83.33 (83,33,77,052) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.43% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.53% आहे.


****

ST/VG/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818618) Visitor Counter : 199