संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नौदल प्रमुखांची मालदीवला भेट

Posted On: 20 APR 2022 5:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2022

नौदल प्रमुख (CNS) पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यात, अॅडमिरल आर हरी कुमार यांनी 18 ते 20 एप्रिल 22 पर्यंत मालदीवला भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी मालदीव प्रजासत्ताकचे माननीय राष्ट्रपती महामहिम  इब्राहिम मोहम्मद सोलिह, माननीय परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहिद, माननीय संरक्षण मंत्री मारिया अहमद दीदी आणि संरक्षण दलाचे प्रमुख (CDF) मेजर जनरल अब्दुल्ला शामल यांची भेट घेतली.

ऍडमिरल आर हरी कुमार यांनी 18 एप्रिल 22 रोजी मालदीवचे संरक्षण मंत्री आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल (MNDF)  नेतृत्वाच्या सन्मानार्थ भारतीय नौदल जहाज सतलजवर स्वागत समारंभ आयोजित केला होता.  INS सतलज, सध्या हायड्रोग्राफिक सहकार्यावरील सामंजस्य करार अंतर्गत संयुक्त हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी मालदीवमध्ये तैनात आहे. नौदल प्रमुखांनी भारत आणि मालदीव यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या पहिल्या नेव्हिगेशन चार्टचे अनावरण केले आणि MNDF च्या क्षमता एकत्रित करण्यासाठी हायड्रोग्राफी उपकरणे सुपूर्द केली.

नौदल प्रमुखांनी MNDF सागरी मालमत्तेला देखील भेट दिली आणि MNDF कर्मचारी आणि भारतीय नौदलाच्या संयुक्त प्रयत्नांची प्रशंसा केली.  MNDF जहाजांच्या पुढील देखभालीसाठी त्यांनी अभियांत्रिकी उपकरणे सादर केली. याद्वारे MNDF च्या क्षमता वाढीच्या प्रयत्नांसाठी भारताच्या वचनबद्धता स्पष्ट केली.

महामारीच्या काळात, दोन्ही देशांनी मिशन सागर आणि ऑपररेशन समुद्र सेतू अंतर्गत, संसाधनांची जमवाजमव आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक यासाठी खूप जवळून काम केले आहे.  महामारी संबंधित प्रवासी निर्बंध शिथिल केल्याने गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांदरम्यान अनेक उच्चस्तरीय संवाद साधला गेला आहे. 

नोव्हेंबर 2021 मध्ये भारतीय नौदल अकादमीच्या पासिंग आऊट परेडमध्ये मालदीवचे संरक्षण मंत्री प्रमुख पाहुणे होते आणि मालदीव तटरक्षक दलाचे कमांडंट कर्नल इब्राहिम हिल्मी यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये विशाखापट्टणम येथे भारताने आयोजित केलेल्या मिलान-2022 मध्ये मालदीव शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.

भारत आणि  मालदीव हिंद महासागरातील सागरी सुरक्षेच्या मुद्द्यांवर समान दृष्टीकोन सामायिक करतात आणि अनेक द्विपक्षीय, लघु-पक्षीय आणि बहुपक्षीय मंच जसे की हिंद महासागर नौदल परिसंवाद आणि कोलंबो सुरक्षा परिषदेत एकत्र काम करत आहेत.

भारताचे माननीय पंतप्रधान यांच्या ध्येयदृष्टी टनुसार सन्मान, संवाद, सहयोग, शांती आणि समृद्धी  या ‘फाइव्ह एस’मार्गदर्शना प्रमाणेनौदल प्रमुखांच्या भेटीमुळे दोन जवळच्या शेजारी सागरी

देशांमधील मजबूत आणि दीर्घकालीन द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाले आणि संरक्षण आणि सागरी क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याची व्याप्ती वाढवण्याचे नवीन मार्ग देखील अधोरेखित झाले.

 

M.Iyengar/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1818423)