संरक्षण मंत्रालय

गोव्यातील मुरगाव बंदर इथे भारतीय तटरक्षक दलाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद सरावाचे संरक्षण सचिवांनी केले उद्घाटन

Posted On: 19 APR 2022 7:04PM by PIB Mumbai

 

गोव्यातील मुरगाव बंदर इथे भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद सराव 'NATPOLREX-VIII' च्या आठव्या भागाचे उद्घाटन संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी 19 एप्रिल 2022 रोजी केले.

समुद्रात गळती झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सज्जता सरावाचे उद्घाटन संरक्षण सचिवांनी केले. यावेळी, भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन, आयसीजीचे महासंचालक  व्ही एस पठानिया, दक्षिण आशिया सहकारी पर्यावरण कार्यक्रमाचे महासंचालक (एसएसीईपी) डॉ मोहम्मद मसुमुर रहमान आणि बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय हवामान विभाग, भारतीय नौदल आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, गोवा. आदी विभागांचे वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते 

या कार्यक्रमात 50 संस्थाचे 85 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात 22 परदेशी मित्र देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे 29 निरीक्षक तसेच श्रीलंका आणि बांगलादेशमधील दोन तटरक्षक जहाजांचा समावेश आहे. समुद्रात होणाऱ्या गळतीचा सामना करण्यासाठी सर्व हितधारकांची तयारी आणि प्रतिसाद क्षमता वाढवणे हा NATPOLREX-VIII चा उद्देश आहे.

एसएसीईपी सामंजस्य करारा अंतर्गत राष्ट्रीय तेल गळती आपत्ती आकस्मिक योजनेमधे (एनओएसडीसीपी) समाविष्ट असलेल्या कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वांचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर प्रमाणीकरण करणे हे याचे उद्दिष्ट आहे. भारत याचा एक भाग आहे. एनओएसडीसीपीच्या विविध घटकांना आकस्मिक योजनांचे प्रमाणीकरण आणि सुधारणा करण्यासाठी आणि समुद्रातील कोणत्याही सागरी गळतीच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी संसाधन संस्थांच्या तसेच भागधारकांच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी सरावादरम्यान, सूचित केले गेले.

सरावादरम्यान विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यात, आयसीजीची 13 जहाजे आणि 10 विमाने, भारतीय हवाई दलाचे एक C-131 विमान, श्रीलंका आणि बांगलादेश या एसएसीईपी सदस्य देशांची दोन जहाजे आणि ओएनजीसीचे एक सागरी पुरवठा जहाज (ऑफशोर सप्लाय व्हेसेल, ओएसव्ही), शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची मालमत्ता आणि मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या टग्सने, प्रतिबंध आणि सागरी गळती नियंत्रण (कंटेनमेंट कम मरीन स्पिल रिकव्हरी), स्वीपिंग आर्म्स, बूम्स आणि स्किमर्सची तैनाती, यांच्या सहाय्याने प्रात्यक्षिके दाखवली. सिंगल शिप ऑपरेटेड कंटेनमेंट कम रिकव्हरी सिस्टीम, अग्निशमन प्रात्यक्षिक, बचाव कार्य, आणि पृष्ठभाग आणि हवेतील तेल गळती दूर करणाऱ्या प्रणालीचेही यावेळी  प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

भारतीय तटरक्षक दलाने या सरावाचे समन्वयन केले आहे. यात बंदरे, तेल कंपन्या, किनारी राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि इतर संसाधन संस्थांसह अन्य भागधारकांच्या मालमत्तांचाही समावेश आहे. टेबल-टॉप सराव, सागरी तेल आणि एचएनएस गळतीवरील प्रदूषण प्रतिसाद कार्यशाळा आणि त्यानंतर समुद्रातील सरावाचा समावेश असलेला दोन दिवसांचा हा कार्यक्रम आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत एनओएसडीसीपीच्या अध्यक्षांनी याचा आढावा घेतला.

भारतीय तटरक्षक दलाने, NATPOLREX व्यतिरिक्त, 18-29 एप्रिल 2022 या कालावधीत चेन्नई इथे इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या (आयओआरए) सदस्य राष्ट्रांसह 18 देशांतील 45 आंतरराष्ट्रीय सहभागींसाठी सागरी तेल प्रतिसाद आणि तयारी या विषयातील क्षमता निर्माण व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित केला आहे.

***

S.Patil/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818135) Visitor Counter : 188