आयुष मंत्रालय

जागतिक आरोग्य संघटनेच्या जामनगर येथील जागतिक पारंपरिक औषध केंद्राचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 18 APR 2022 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2022

भारतातील पारंपरिक औषधांच्या क्षेत्रातील- जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध केंद्राच्या स्थापनेची ऐतिहासिक घटना तसेच जीएआयआयएस अर्थात जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे आयोजन - या दोन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींविषयी चर्चा करण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालय आणि केंद्र सरकार यांनी आज संयुक्तपणे पूर्वतयारी वजा पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. हे दोन्ही कार्यक्रम गुजरातमध्ये होणार असून त्या कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांची सन्माननीय उपस्थिती असेल. तसेच अनेक देशांचे राजदूतया दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

या आगामी कार्यक्रमांविषयी माहिती देताना केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, हे दोन्ही कार्यक्रम भारताच्या आयुष उद्योग क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरतील. जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेच्या माध्यमातून भारताला आयुर्वेदिक आणि वनौषधी उत्पादनांसाठी जागतिक बाजारात स्थान निर्माण करण्याची संधी प्राप्त होईल. एका सुवर्ण युगाच्या अशा प्रवेशद्वारापाशी आपण उभे आहोत, जिथून आपण आपल्या पारंपरिक ज्ञानाच्या भांडवलाचा योग्य उपयोग करू शकतो आणि जगाची सेवा करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो.

राजकोट येथे आज झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह,आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई काळूभाई, केंद्रीय आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी उपस्थितांना जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध केंद्राची आणि जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेची ओळख करून दिली. या परिषदेमध्ये त्यांनी केंद्रीय आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यातील भागीदारीची ठळक वैशिष्ट्ये विषद केली आणि कोविड-पश्चात जगामध्ये पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात गुंतवणूक आणि अभिनव संशोधने यांचे महत्व अधोरेखित केले.  

 

 

 

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1817835) Visitor Counter : 182