अर्थ मंत्रालय
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी -जागतिक बँकेच्या वसंतकालीन बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज रात्री उशिरा अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार
अनेक देशांसोबतच्या द्विपक्षीय बैठकींसोबतच जी -20 देशांचे वित्तमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नरच्या बैठकांमध्येही केंद्रीय वित्तमंत्री सहभागी होणार
Posted On:
17 APR 2022 9:19PM by PIB Mumbai
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन 18 एप्रिल 2022 पासून अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत.या दौऱ्या दरम्यान निर्मला सीतारामन या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँक, जी-20 वित्त मंत्र्यांच्या वसंतकालीन बैठका आणि सेंट्रल बँक गव्हर्नरच्या (एफएमसीबीजी) बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांसोबतच्या द्विपक्षीय बैठकींमध्ये वित्तमंत्री भाग घेतील.
अर्धसंवाहक (सेमी कंडक्टर), ऊर्जा आणि भारत सरकारसाठी प्राधान्य असलेल्या इतर क्षेत्रांमधील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी वित्तमंत्री स्वतंत्रपणे बैठकाही घेतील.
एका उच्चस्तरीय बैठकीत वित्तमंत्री जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांचीही भेट घेणार आहेत.
या दौऱ्यादरम्यान, सीतारामन आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी आयोजित केलेल्या “मनी अॅट अ क्रॉसरोड” या विषयावरील उच्च-स्तरीय चर्चासत्रात भाग घेतील.
जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी , जी -20 आणि वित्तीय कृती कार्य दल यांच्या अधिकृत बैठकांव्यतिरिक्त,वित्तमंत्री वॉशिंग्टन डीसी येथील अटलांटिक कौन्सिल या प्रमुख तज्ञ संस्थेच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहतील आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवादही साधणार आहेत.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817625)
Visitor Counter : 230