माहिती आणि प्रसारण मंत्रालय

प्रसार भारतीच्या संग्रहातील सामग्रीमुळे पंतप्रधान संग्रहालयाला मिळाली चेतना

Posted On: 16 APR 2022 4:18PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 एप्रिल 2022 रोजी ज्या पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन झाले त्याच्या विकसनात प्रसार भारतीच्या संग्रहातील साहित्याचा समावेश झाल्यामुळे, प्रसार भारतीला या महान राष्ट्रहिताच्या कार्यात योगदान देण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ.बी.आर.आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीदिनी नवी दिल्ली येथे हा उद्घाटन सोहोळा पार पडला. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत देशाला लाभलेल्या सर्व पंतप्रधानांच्या योगदानाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या तसेच सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या दुर्मिळ साहित्याचे अपरंपार भांडार जतन करणाऱ्या प्रसार भारतीने, या संग्रहालयाला सुमारे 206 तासांचे ध्वनीमुद्रण आणि 53 तासांचे छायाचित्रण देऊन राष्ट्रकार्यात लक्षणीय योगदान दिले आहे. या दुर्मिळ साहित्यामध्ये, संविधान सभेला उद्देशून केलेले भाषण (ट्रीस्ट विथ डेस्टिनी), पहिल्या स्वातंत्र्यदिनाला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाचे प्रसारण, शपथविधी समारंभ, अणुउर्जा संस्थेचे उद्घाटन आणि पहिल्या अणुभट्टीची सुरुवात, आणीबाणीची घोषणा, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उद्देशून केलेलं भाषण, अलिप्तता परिषद, दिल्ली मेट्रोसेवेचे उद्घाटन आणि अशा इतर अनेक महत्त्वाच्या घटनांचा यात समावेश आहे. वर्ष 1940 पासूनच्या महत्त्वाच्या प्रसंगांची अनमोल ध्वनिमुद्रणे केवळ सरकारी प्रसारण संस्थेने जतन केली असून प्रसारभारतीने लोकहितार्थ त्यांचे डिजिटलीकरणदेखील करून घेतले आहे.

भारताच्या सर्व पंतप्रधानांचे जीवन आणि योगदान यांची माहिती देणारे हे पंतप्रधान संग्रहालय म्हणजे येणाऱ्या पिढ्यांसाठी मोठे माहितीचे केंद्र ठरणार आहे. सुमारे 10,000 चौरस मीटर्सहून अधिक परिसरात उभारण्यात आलेले हे संग्रहालय दुर्मिळ छायाचित्रे, भाषणे, छायाचित्रणाचे लहान तुकडे, वर्तमानपत्रांतील मजकूर, मुलाखती आणि मूळ हस्तलिखिते यांच्यासह सर्व भारतीय पंतप्रधानांशी संबंधित साहित्याचे दर्शन घडवेल. आभासी सत्यता, वर्धित सत्यता आणि आंतरसंवादात्मक पडद्यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून हे संग्रहालय आकर्षक पद्धतीने माहिती पुरवेल.

पंतप्रधान संग्रहालयाला देण्यात आलेल्या प्रसार भारतीच्या संग्रहातील ध्वनिमुद्रणांची यादी सर्वांच्या माहितीसाठी खाली दिली आहे:

Audio Content

Name of the Speaker

No. of Hours (HH:MM:SS)

Pt. Jawahar Lal Nehru

29:42:29

Lal Bahadur Shastri

13:55:53

Indira Gandhi

10:19:02

Morarji Desai

20:08:25

Charan Singh

06:34:32

Rajiv Gandhi

31:30:08

Vishwanath Pratap Singh

04:30:16

Chandra Shekhar

04:28:21

P.V. Narasimha Rao

22:40:14

H.D. Deve Gowda

05:31:43

I.K. Gujral

11:38:20

Atal Bihari Vajpayee

36:21:48

Manmohan Singh

08:41:35

Total

Approx 206 Hours

 

Video Content

Name of the Speaker/Video Clips/Shots

No. of Hours (HH:MM:SS)

Atal Bihari Vajpayee (PM Speech)

00:06:21

P.V. Narasimha Rao
(PM Speech)

00:25:00

Chandra Shekhar

00:26:14

I.K. Gujral

01:00:31

H.D. Deve Gowda

00:21:48

Manmohan Singh

00:02:26

Morarji Desai

00:56:04

Lal Bahadur Shastri

00:30:19

Atal Bihari Vajpayee

00:36:26

Indira Gandhi

01:32:13

V.P. Singh

00:23:57

P.V. Narasimha Rao

00:31:22

Rajiv Gandhi

01:26:17

V.P. Singh

00:36:38

Indira Gandhi

08:11:00

Rajiv Gandhi

02:56:20

P.V. Narasimha Rao

00:52:46

Manmohan Singh

16:52:04

Narendra Modi

14:39:04

I.K. Gujral

00:35:53

Aapat Kal Ke Sabak
(Indira Gandhi)

00:01:29

Fakhruddin Ali Ahmed -
Ghar Ke Mahaul Mein - Ek Shradhanjli

00:00:10

In-depth of the Emergency in India -
Shots of jail
 (Indira Gandhi)

00:00:18

Indira Gandhi

00:03:04

Atal Bihari Vajpayee
Independence day Celebrations - 2003

00:01:45

War shots and Address by Lal Bahadur Shastri

00:03:50

Total

Approx 53 Hours

 

असेच दुर्मिळ आणि ऐतिहासिक साहित्य प्रसार भारतीच्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे. ही वाहिनी मिळविण्यासाठी कृपया खाली दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा.

प्रसार भारतीच्या संग्रही असणाऱ्या अशा ऐतिहासिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या तसेच सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या दुर्मिळ साहित्यापैकी वर्ष 1930 ते 2000 पर्यंतच्या अशा साहित्याची यू ट्यूब वाहिनीवर उपलब्ध दशकनिहाय यादी खाली दिली आहे:

Decade

Playlist

 

1930s

 

https://www.youtube.com/watch?v=oqfGcPvP14o&list=PL97ZfRkZjejJQd8XKfoDhAX_Iv32h-5yu

 

 

1940s

 

https://www.youtube.com/watch?v=8n9c9qdZoVI&list=PL97ZfRkZjejLA2EXa_gO4VJIqtg21T4et

 

 

1950s

 

https://www.youtube.com/watch?v=tOAkGtIU0Zg&list=PL97ZfRkZjejKZjtmI4-3ZsmsNYtiSj0vs

 

 

1960s

 

https://www.youtube.com/watch?v=qPgMZuu-7cc&list=PL97ZfRkZjejJFDr8ekjLYMJvo4b2vFQcH

 

 

1970s

 

https://www.youtube.com/watch?v=MBOZ_urMxEU&list=PL97ZfRkZjejI3FjN30c4H4NDcc6_W2Mm4

 

 

1980s

 

https://www.youtube.com/watch?v=tmxKnDi7xMY&list=PL97ZfRkZjejIXgrMm_2OvdA9EBi4516Vs

 

 

1990s

 

https://www.youtube.com/watch?v=zwjLzbr0Dxk&list=PL97ZfRkZjejJvPBCQxGiVUwDru4ZydyrJ

 

 

2000s

 

 

https://www.youtube.com/watch?v=6p75IT4_8xg&list=PL97ZfRkZjejJkq1H9oQ-u6mPXFEf557Qe

 

 

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1817302) Visitor Counter : 207